फसवणूक करताना पुरुष सहसा देतात 'अशी' कारणं, महिलांनी रहावं सतर्क

कोणत्याही व्यक्तीसोबत राहिल्यावर तुम्हाला त्यांचं सत्य आणि खोटं सहज कळते

Updated: Aug 24, 2022, 02:31 PM IST
फसवणूक करताना पुरुष सहसा देतात 'अशी' कारणं, महिलांनी रहावं सतर्क title=

मुंबई : असं म्हणतात खरं कितीही स्पष्टपणे लपवलं तरीही ते एक दिवस समोर येतच. महिलांचा सिक्स सेंस खूप तीक्ष्ण असतो, ज्यामुळे त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींची लगेच जाणीव होते. त्याच वेळी, जर जोडीदाराचा मुद्दा असेल तर महिलांना ते खरं की खोटं हे शोधणं कठीण नाही. 

कोणत्याही व्यक्तीसोबत राहिल्यावर तुम्हाला त्यांचं सत्य आणि खोटं सहज कळते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशाच काही बहाण्या आणि खोट्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यावरून तुम्हाला सहज कळू शकेल की तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करतोय.

नेहमी कामाचा बहाणा

रात्रीच्या जेवणाच्या वेळी तुमच्या पार्टनरच्या फोनवर फोन येतो का? की तुमचा जोडीदारही महत्त्वाच्या कामाचा आव आणून तुमच्यासोबत असताना मध्येत निघून जातो? हे फसवणुकीचे सर्वात मोठं लक्षण आहे. जेव्हा-जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करतो तेव्हा ते कामाच्या बाबतीत अशा प्रकारे बहाणा करतात.

शरीरयष्टीवर विशेष लक्ष देणं

जर तुमच्या पार्टनरने अचानक त्याच्या फिगरकडे खूप लक्ष द्यायला सुरुवात केली असेल आणि जीम सुरू केलं असेल तर शक्यता आहे की तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करतोय. तो दुसऱ्या कोणाला तरी त्याच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोडीदाराच्या वागण्यातील हा बदल तो तुमची फसवणूक करत असल्याचा आहे.

घराबाहेर जाण्याची संधी शोधणं

जर तुमचा जोडीदार तुमची फसवणूक करत असेल, तर तो त्याच्या पार्टनरला भेटण्याचा मार्ग शोधत असण्याची शक्यता आहे. 

अचानक भांडण होणं

जर तुमचा पार्टनर कोणत्याही कारणाविना भांडत असेल किंवा सतत भांडणासाठी कारणं शोधत असेल तर शक्यता आहे की तो तुम्हाला धोका देत असावा.

(Disclaimer: वर दिलेल्या गोष्टी केवळ माहितीसाठी आहेत.)