मायग्रेनचा त्रास असलेल्यांसाठी आनंदाची बातमी

न्यूयॉर्क संशोधकांनी स्मार्टफोनवर आधारीत एक अॅप बनवला आहे. जो मायग्रेनग्रस्त लोकांना डोके दुखी थांबवण्यास मदत करु शकतो.

Updated: Jun 5, 2019, 05:10 PM IST
मायग्रेनचा त्रास असलेल्यांसाठी आनंदाची बातमी title=

मुंबई : न्यूयॉर्क संशोधकांनी स्मार्टफोनवर आधारीत एक अॅप बनवला आहे. जो मायग्रेनग्रस्त लोकांना डोके दुखी थांबवण्यास मदत करु शकतो. युनायटेड स्टेट्स ऑफ न्यूयॉर्क वैद्यकीय विद्यापीठ (एनवाययू) यांनी या अॅपचा वापर करून पाहिला आहे. ज्या रूग्णांनी आठवड्यात कमीतकमी दोन वेळेस या अॅपचा वापर केला, त्यांना दर महिन्याला कमीत कमी चार दिवस सरासरी मायग्रेनपासून आराम मिळाला.

रिलॅक्स ए हेड नावाचा हा अॅप रुग्णांना स्नायूंमध्ये सतत आराम पडण्याचे उपाय सांगतो. रुग्णांना वेगवेगळ्या स्नायूंमध्ये विश्रांती मिळते, ज्यामुळे तणाव कमी होतो. 

जर्नलमध्ये नेचर डिजिटल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, हे पहिलं असं अॅप आहे, यात आरोग्याशी संबंधित परिणामांचं मुल्यांकन केलं जातं. 

एनयूवायमध्ये सहाय्यक प्राध्यापक मिया मिनेन या विषयी म्हणतात, आमच्या एकूण अभ्यासानुसार हे सिद्ध झालं आहे की, रूग्णांजवळ त्यांच्या आरोग्याविषयीच्या लक्षणांची माहिती असेल, तर याचा वापर करता येऊ शकतो. 

रूग्ण आपल्या हिशेबानुसार याचा वापर करतात आणि ते स्वस्त आहे. मायग्रेनचं मुख्य लक्षण आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात डोकेदुखी आणि मोठ्या आवाजाचा त्रास.