'या' 5 कारणांमुळे मांड्यांमध्ये येते खाज, सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्यापासून सुटका मिळवा

या ऋतूमध्ये आर्द्रता असते आणि त्यामुळे मांड्यांमध्ये पुरळ उठणे उठतात. कधी कधी संसर्ग इतका वाढतो की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.

Updated: Jul 12, 2022, 08:19 PM IST
'या' 5 कारणांमुळे मांड्यांमध्ये येते खाज, सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्यापासून सुटका मिळवा title=

मुंबई : तुम्ही हे पाहिलं किंवा अनुभवलं असेल की, पावसाळ्यात आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. ज्यामध्ये सर्दी, खोवला, ताप, व्हायरल, डायरिया, स्किन प्रॉबलम इत्यादींच्या समस्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये स्किन इंफेशन किंवा पायांच्या दोन्ही जांगांमध्ये खाज किंवा दाद उठणे या खूप मोठया समस्या आहेत. ज्याचा त्रास बहुतेक लोकांना झेलावा लागतो.

खरंतर पावसाळ्यात घामाच्या ग्रंथी बंद होतात. अशा परिस्थितीत शरीरात जो काही घाम येतो तो पायाखालून वाहू लागतो. या ठिकाणची जागा अतिशय नाजूक आणि सेन्सिटीव्ह असते, त्यामुळे त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे आणि दाद येणे या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात.

या ऋतूमध्ये आर्द्रता असते आणि त्यामुळे मांड्यांमध्ये पुरळ उठणे उठतात. कधी कधी संसर्ग इतका वाढतो की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. त्याची लक्षणे कोणती आहेत आणि कोणत्या कारणांमुळे होते ते घडू शकते ते जाणून घेऊया. ज्यामुळे तुम्ही काळजी घेऊन भविषात होणारा मोठा त्रास किंवा धोका रोखू शकतात.

मांड्या घासणे

एक कापड दुस-याला घासत राहते, अशा स्थितीत कपड्यांमधील घर्षणामुळे मांडीच्या मध्यभागी दाद उठू लागतात. येथे कपड्यांवर देखील घाम साचतो, ज्यामुळे खाज सुटू लागते. त्यामुळे ज्याच्या मांड्या जाड आहेत किंवा अंगावर जास्त मास आहे अशा लोकांनी कपड्यांची काळजी घ्यावी.

कोरडी त्वचा

ज्यांची त्वचा कोरडी असते, त्यांना पुरळ आणि खाज येण्याची समस्या जास्त असते. पावसात हा त्रास बहुतेकांना होतो, ज्यामुळे त्वचा कोरडी पडून देऊ नका.

घाम ग्रंथी ब्लॉक होणे

मांडीच्या मधोमध असलेली घाम ग्रंथी जर ब्लॉक झाली तर त्यामुळे त्रास होतो. घाम तळाशी साचत राहतो आणि तुम्हाला हानी पोहोचवतो.

केस वाढणे

आपल्या सर्वांना माहित आहे की अनेक लोक मांड्यांचे केस स्वतःच काढतात, अशा परिस्थितीत वापरल्या जाणार्‍या रसायनामुळे खाज सुटते आणि लाल पुरळ उठतात. त्यामुळे कोणत्याही प्रोडक्टचा वापर करताना 10 वेळा विचार करा.

घट्ट कपडे घालू नका

शक्यतो मांड्या घासणारे कपडे घालणे टाळा, घट्ट कपडे त्यांच्यामध्ये घासतात आणि घाम तसाच राहतो. ज्यामुळे जास्त खाज सुटते

स्क्रॅचिंग टाळा

जर तुम्हाला घामामुळे खाज सुटत असेल किंवा जळजळ होत असेल, तर मऊ कापड्याने हलक्या हाताने मसाज करण्याचा प्रयत्न करा, परंतु जोरदारपणे स्क्रॅच करू नका, यामुळे तुम्हाला रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.

घरगुती उत्पादने वापरा

घरातील नैसर्गिक गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करा, दुकानातील कोणतीही क्रिम किंवा संसंधन वापरु नका

मॉइश्चरायझर वापरा

मॉइश्चरायझर तुमची त्वचा मऊ करते, म्हणून चांगले मॉइश्चरायझर वापरण्याचा प्रयत्न करा

उबदार पाण्याने अंघोळ करा

कोमट पाण्याने आंघोळ केल्याने खाज कमी होते. शरीरात संसर्ग होण्याचा धोका कमी असतो, परंतु खूप गरम पाण्याने आंघोळ करू नका.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)