सेल्फी घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

तुम्ही देखील सेल्फीचे शौकीन आहात का? 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 6, 2018, 09:55 AM IST
सेल्फी घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी  title=

मुंबई : तुम्ही देखील सेल्फीचे शौकीन आहात का? 

दिवसांतून कितीवेळा सेल्फी घेणं तुम्ही पसंद करता. किंवा सेल्फी घेतला नाही तर तुम्ही बैचेन होता का? मग हा रिसर्च तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे. लंडनच्या नॉटिंघम ट्रेंट युनिर्व्हसिटी आणि तामिळनाडूच्या त्यागराजार स्कूल ऑफ मॅनेजमेंटने आपल्या रिसर्चवर सांगितलं की, हा रिसर्च इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड अॅडिक्शनमध्ये प्रकाशित झाला आहे. 

यामुळे भारतात केला रिसर्च 

1) भारतात फेसबुकचा सर्वाधिक वापर होतो. 
2) सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 60टक्क्यांहून जास्त भारतात आहे. 
3) मार्च 2014 ते सप्टेंबर 2016 या कालावधी दरम्यान 127 मृत्यू सेल्फीमुळे झाले आहेत. 127 मृत्यूपैंकी 76 मृत्यू हे भारतात झालेत. 

सेल्फाइटिसला असे ओळखा 

1) सेल्फाइटिस हा आजार तीन स्तरावर होतो. 
2) दिवसांतून 3 वेळा सेल्फी घेणं, मात्र सोशल मीडियावर तो सेल्फी शेअर न करणं 
3) सतत सेल्फी सोशल मीडियावर शेअर करणं 
4) 6 फोटो सोशल मीडियावर शेअर करणं