उन्हाळ्यात जीन्स वापरताय, अशी घ्या काळजी...

उन्हाळ्यात सगळ्यात सोयीस्कर म्हणून तुम्ही जीन्स घालत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Updated: Apr 9, 2019, 03:52 PM IST
उन्हाळ्यात जीन्स वापरताय, अशी घ्या काळजी...  title=

सुस्मिता भदाणे, झी २४ तास, मुंबई : उन्हाळ्यात सगळ्यात सोयीस्कर म्हणून तुम्ही जीन्स घालत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उन्हाळ्यात बाहेर निघालं की शरीराची अक्षरश: लाही-लाही होण्यास सुरुवात झाली आहे. अशात जर तुम्ही घट्ट जीन्स वापरत असाल, तर जीन्स वापरताना नक्की काळजी घ्या. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना जीन्स-टॉप किंवा टी शर्ट आणि गॉगल लावला असा रफटफ पेहराव तुम्ही करत असाल. तर तुमच्यासाठी थोडं महत्त्वाचं..... 

जीन्स अतिशय घट्ट असेल तर जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. घट्ट जीन्स वापरल्यामुळे त्वचेची जळजळ, त्वचा काळवंडणं, घामोळ्या येणं, खाज सुटणं, काळे चट्टे येणं असे त्रास होऊ शकतात. गेल्या काही दिवसांत घट्ट जीन्समुळे जंतूसंसर्ग झाल्याचं प्रमाण वाढलंय. विशेष म्हणजे खाज कमी करण्यासाठी स्टेरॉईडयुक्त मलम लावलं जातं. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते. 

उन्हाळा असल्यास पातळ, सुती कपडे घालणे योग्य आहे. त्यामुळे शरीरीतील घाम शोषूण घेण्यास मदत होते. जाड कपड्यांचा पेहराव शक्यतो करू नये. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय केणतीही क्रिम वापरू नये. असा सल्ला डॉ. उदय कोपकर, त्वचारोग तज्ज्ञ यांनी दिला आहे.

उन्हाळ्यात प्रामुख्याने अतिनील किरणांमुळे डोळ्यांना त्रास होतो. गॉगल बी २ इतका काळा असणं गरजेचं आहे. यूव्ही-रेजपासून संरक्षण करणाऱ्या कॉन्टॅक्ट लेन्ससुद्धा उपलब्ध आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात तुमच्या शरीराची काळजी नक्की घ्या.