सकाळी उठल्यावर तुम्हालाही डोकेदुखीचा होतो का त्रास? मग याकडे दुर्लक्ष करू नका

आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीची कारणं काय असू शकतात हे सांगणार आहोत. तसेच यावरील उपाय देखील सांगणार आहोत. जेणे करुन या समस्येपासून तुम्ही लांब राहाल.

Updated: Jul 27, 2022, 09:06 PM IST
सकाळी उठल्यावर तुम्हालाही डोकेदुखीचा होतो का त्रास? मग याकडे दुर्लक्ष करू नका title=
never ignore morning headache or Early Morning Headaches know its Causes Prevention and More

मुंबई : सकाळी उठल्यानंतर आणि झोप पूर्ण झाल्यानंतर लोकांना ताजेतवाणे वाटते. परंतु असे असले तरी, बरेच असे लोक आहेत ज्यांना सकाळी उठताच डोकेदुखीचा त्रास सुरु होतो. परंतु लोक याला सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण हे सामान्य नाही, हो यामागे अनेक कारणे असू शकतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीची कारणं काय असू शकतात हे सांगणार आहोत. तसेच यावरील उपाय देखील सांगणार आहोत. जेणे करुन या समस्येपासून तुम्ही लांब राहाल.

कमी रक्त

जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर सकाळी उठल्यावर तुमचे डोके दुखू शकते. त्याच वेळी, शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे डोकेदुखीसह अशक्तपणा आणि चक्कर येणे देखील होऊ शकते.

शुगर लेवल

जर तुमच्या शरीरातील साखर असामान्य असेल, तर तुम्हाला मॉर्निंग सिकनेसची लक्षणे दिसू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, मॉर्निंग सिकनेसचे लक्षण म्हणजे डोकेदुखी. दुसरीकडे, जर तुम्ही रोज सकाळी उठता आणि डोकेदुखी होत असेल तर तुम्ही तुमची साखर पातळी तपासली पाहिजे.

पाण्याची क्षमता कमी होणे

जर तुम्ही पाणी कमी पित असाल, तर सकाळी उठल्यानंतर होणाऱ्या डोकेदुखीचे कारण पाण्याची कमतरता असू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. फक्त झोपताना जास्त पाणी पिऊ नका, त्यापूर्वी तुम्ही पाणी पिऊ शकता.

झोपेचा विकार

झोपेच्या विकारामुळे सकाळी डोकेदुखी जाणवते. त्याच वेळी, अनेक लोकांमध्ये तणावामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवते. आम्ही तुम्हाला सांगतो की, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

सकाळी डोके दुखत असताना करा या गोष्टी

सकाळी उठल्यावर लिंबू पाणी प्या. थंड पाण्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस सामान्य पाण्यात मिसळून पिऊ शकता. यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)