पुरूषांकरता नवा पर्याय, कंडोमपेक्षा ठरणार अधिक प्रभावशाली

पुरूषांकरता नवा पर्याय उपलब्ध 

Updated: Nov 10, 2021, 07:55 PM IST
पुरूषांकरता नवा पर्याय, कंडोमपेक्षा ठरणार अधिक प्रभावशाली title=

मुंबई : गर्भधारणा (Pregnancy) रोखण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, इंट्रा युटरिन उपकरण, स्पर्मीसाइडल जेल यासारखे वेगवेगळे पर्याय वापरले जातात. ज्याने महिलांना नको असलेली गर्भधारणा रोखू शकतात. यामधील कंडोम सोडून इतर सगळे पर्याय शरीराला घातक असतात. 

महिलांच्या तुलनेत पुरूषांकरता गर्भनिरोधक म्हणून कंडोम हा एकच पर्याय आहे. मात्र तरीही अनेक कपल गर्भधारणेची इच्छा नसतानाही कंडोमचा वापर करणं टाळतात. कारण यामुळे संभोगामध्ये जे सुख हवं असतात. ते मिळण्यास अडथळा निर्माण होतो, असा त्यांचा समज असतो. मात्र आता बाजारात एक असा कंडोम येत आहे. ज्यामुळे सॅटिफॅक्शन सर्वाधिक मिळू शकतं, असा दावा केला जात आहे. 

कंडोमची जागा घेणार जी - कॅप 

असा दावा केला जात आहे की, आता गर्भधारणा रोखण्यासाठी कंडोम वापरण्याची गरज नसून केवळ 'कॅप' असलेला कंडोम पुरेसा असेल. म्हणजेच कंडोमऐवजी आता छोटी 'गॅलेक्टिक कॅप' घेतली जाणार आहे. जगातील हा पहिलाच कंडोम असेल ज्याचा शाफ्ट खुला असेल. हा कंडोम विकसित करणाऱ्या पॉवेल डेव्हलपमेंटचे सीईओ चार्ल्स पॉवेल यांनी दावा केला आहे की, ही 'गॅलेक्टिक कॅप' सध्याच्या कंडोमप्रमाणेच आवश्यकता नसलेल्या गर्भधारणेपासून संरक्षण देईल. परंतु त्याच वेळी लैंगिक संबंधांना अधिक आरामदायी बनवेल. अशा परिस्थितीत, जे लोक सध्याचा कंडोम वापरणे कंटाळवाणे मानतात, त्यांच्यासाठी हा कंडोम खूप प्रभावी ठरेल.

लोकांच्या पसंतीला उतरेल 

पॉवेल डेव्हलपमेंटचे सीईओ चार्ल्स पॉवेल म्हणतात, की सध्या आम्हाला दिवसाला 100-150 ऑर्डर मिळत आहेत. ही मागणीही आम्ही पूर्ण करू शकत नाही, मात्र लवकरच हजारो ऑर्डर पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच 'गॅलेक्टिक कॅप'ची ऑर्डर मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे. चार्ल्स म्हणतात की, आजच्या युगात ग्राहकांना नवीन गर्भनिरोधक पर्याय हवा होता, जो पारंपारिक कंडोमपेक्षा अधिक आरामदायक आहे, ग्राहकांची ही इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे.