स्मोकिंग करणारांना मिळणार बोनस आणि सुट्टी, पण आरोग्याचे काय?

धु्म्रपान करणे हे आरोग्यासाठी किती घातक आहे याबाबत नेहमीच जागृती केली जाते. पण, टोकियोतीली एका कंपनीने चक्क धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीसाठी खास खूशखबर दिली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 1, 2017, 11:35 PM IST
स्मोकिंग करणारांना मिळणार बोनस आणि सुट्टी, पण आरोग्याचे काय? title=

टोकियो : धु्म्रपान करणे हे आरोग्यासाठी किती घातक आहे याबाबत नेहमीच जागृती केली जाते. पण, टोकियोतीली एका कंपनीने चक्क धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीसाठी खास खूशखबर दिली आहे.

टोकियोतील ऑनलाईन कॉमर्स कन्सल्टिंग अॅण्ड मार्केटींग कंपनी पिआलाने सप्टेंबर महिन्यापासून हा उपक्रम सुरू केला होता. एका कर्मचाऱ्याने धुम्रपाण करणारे लोक सतत जागेवरून उठून बाहेर जाताता त्यामुळे ते कामात अधिक वेळ देत नाहीत. हा कालाप्यवय आहे, अशा आषयाची तक्रार केली होती. या कर्मचाऱ्याची तक्रार पाहून व्यवस्थापनाने ही गोष्ट नकारात्मकपणे घेण्याऐवजी सकारात्मकपणे केला. त्यातून सुरू झाला एक अनोखा उपक्रम .

कंपनीची प्रवक्ता हिरोताका मत्सुशिमाने सांगितले की, आमचे कार्यालय २९व्या मजल्यावर आहे. तसेच, धुम्रपान कक्ष (स्मोकींग झोन) इमारतीच्या तळमजल्यावर होता. त्यामुळे वरून खालपर्यंत जाण्यासाठी किमान १० मिनिटे लागत असत. त्यामुळे आम्ही याकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले. धुम्रपान करताना लोक विचारांची देवान-घेवान करतात. कामातील समस्येवर पर्याय शोधतात. याचाच वापर कंपनीसाठी करून घेण्यासाठी आम्ही या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच, त्यांना धुम्रपानाचे व्यसन सोडण्यापेक्षा आम्ही त्यांना सुट्टी आणि बोनस द्यायला सुरूवात केली.