अनियमित जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, हे आहेत दुष्परिणाम

 महिलांच्या प्रजननक्षमतेवरही त्याचा विपरित परिणाम

Updated: Sep 28, 2020, 03:32 PM IST
अनियमित जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, हे आहेत दुष्परिणाम title=

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून लठ्ठपणा ही एक समस्या बनू लागली आहे. त्यातच आता लॉकडाऊनमध्ये नागरिक घरात बसून आहेत. प्रत्येकावर कोरोना संकटाचा ताण निर्माण झाला आहे. सकाळचा मॉर्गिक वॉकही बंद झाला आहे. या नियमित कामाच्या वेळापत्रकात बिघाड झाल्याने लठ्ठपणाची समस्या अधिकच वाढू लागली आहे. या लठ्ठपणामुळे केवळ आपल्या शरीरयष्टीवरच परिणाम होत नाही, तर त्यामुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलन झाल्याने महिलांच्या प्रजननक्षमतेवरही त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. यासंदर्भात ग्लोबल-अपोलो रूग्णालयाच्या बॅरिअँटिक अँण्ड लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी माहिती दिली.

पीसीओएस एक हार्मोनल समस्या आहे. यात महिलांच्या शरीरात पुरूष हार्मोनची पातळी वाढते. अशा स्थितीत गर्भधारणेवर परिणाम होतो. परिणामी भविष्यात वंधत्वाच्या समस्येलाही तोंड दयावे लागू शकत. प्रजननक्षमतेवरपरिणाम होण्याची अनेक कारणे आहेत. यातील एक मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा... शरीरा चरबीमुळे बीजफलनाची शक्यता कमी होते. त्यामुळे लठ्ठ स्त्रियांना गर्भधारणा होत नसल्यास अतिरिक्त वजकमी करण्याचा सल्ला दिला जातो. शरीराचे वजन आणि अतिरिक्त चरबी किंवा मेद वितरण या गोष्टींचा परिणाम गर्भधारणेवर होत असतो.

पीसीओएसशी संबंधित काही सामान्य लक्षणे म्हणजे मासिक पाळीतील अनियमितता, मुरुम, शरीरातील केसांची वाढ, वंध्यत्व, टाळूचे केस बारीक होणे इ. पीसीओएस ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये लठ्ठपणा झपाट्याने वाढतो. ज्यामुळे इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. पीसीओएस आणि लठ्ठपणा याचा एकमेकांशी काय संबंध आहे हे समजू शकलेलं नाही. परंतु, या दोन्ही समस्यांनी त्रस्त असणाऱ्या महिलांना अनेक व्याधींचा सामना करावा लागतो.

महत्त्वाचं म्हणजे, आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, पीसीओएस आणि लठ्ठपणामुळे ग्रस्त अशा अनेक स्त्रियांमध्ये आत्मविश्वास कमी होतो. अशा महिला वजन कमी करण्यासाठी अनेक पर्य़ायांचा वापर करू लागतात.

आज शरीराची प्रतिमा सर्वत्र चर्चेचा विषय आहे. आमचे सामाजिक जीवन सोशल मीडियाभोवती फिरत आहे. इतरांपेक्षा आपण सुंदर दिसत नाही, या विचाराने मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय कामावर एकाग्रता, खाण्याच्या विकृती,  शारीरिक आरोग्यावर आणि इतरांशी असलेल्या आपल्या संबंधांवरही परिणाम होऊ शकतात. अशा स्थितीत बर्‍याच वेळा पीसीओएससारख्या मूलभूत आरोग्याच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते आणि ती व्यक्ती सतत वजन वाढणे, नकारात्मक शरीराची प्रतिमा आणि कमी आत्मसन्मान या गोष्टीमध्ये अडकून पडते.

विशेषतः पीसीओएस आजार असल्याचे निदान झाल्यास त्यावर योग्य ते उपचार करता येऊ शकतात. यामुळे ज्या महिला पीसीओएसने पीडित आहेत किंवा पीसीओएसची लक्षणे दर्शवितात अशा स्त्रियांनी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

वजन कमी होणे पीसीओएसच्या उपचार योजनेचा अविभाज्य भाग आहे परंतु हे समजणे महत्वाचे आहे की पीसीओएस ग्रस्त व्यक्तीचे वजन कमी करणे अधिक कठीण आहे. म्हणूनच वजन कमी करण्याच्या तज्ञांच्या मदतीची आवश्यकता असू शकते. कृपया स्वत: ची औषधोपचार करु नका किंवा इंटरनेटवर आधारित वजन कमी करण्याच्या कार्यक्रमात अडकण्याच्या जाळ्यात अडकू नका. शेवटी, आपण केवळ आपले शरीर किंवा तिची प्रतिमा नाही. आपण आपल्या शरीरासाठी आपल्यासाठी करत असलेल्या सर्व गोष्टींचा आपण आदर केला पाहिजे आणि आपण त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.