मुंबई : ओमायक्रोन सध्या संपूर्ण जगाची चिंता बनला आहे. दरम्यान, ओमिक्रॉनवर लसींसंदर्भात अभ्यास करण्यात आला आहे, हा अभ्यास दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटने फायझर लसीवर केला आहे. या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ओमिक्रॉनवर फायझर लसीच्या दोन डोसचा परिणाम केवळ काही अंशतः होतो.
या अभ्यासात आणखी एक गोष्ट देखील समोर आली आहे की, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि त्यांना आधीच संसर्ग झालेल्या बऱ्याच प्रकरणांमध्ये परिणाम काही अंशी दिसून आला. या अभ्यासात असंही सुचवण्यात आलं आहे की, लसीचा बूस्टर डोस या व्हेरिएंटपासून संरक्षण करू शकतो.
आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर अॅलेक्स सिगल यांनी ट्विटरवर सांगितलं की, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या न्यूट्रलायझेशनमध्ये मोठी घट झाली आहे. जी पूर्वीच्या कोविड स्ट्रेनपेक्षा जास्त आहे.
त्यांनी सांगितलं की, अशा 12 लोकांच्या रक्ताची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली, ज्यांनी फायझर/बायोटेक लस घेतली होती. यापैकी, 6 पैकी 5 लोक, ज्यांनी लसीचा डोस घेतला होता आणि त्यांना कोरोनाच्या पूर्वीच्या व्हेरिएंटची लागण झाली होती, त्यांनी ओमिक्रॉन व्हेरियंटला निष्प्रभ केले.
सिगल म्हणतात, मी जे विचार करत होतो त्या तुलनेत जे निकाल आले आहेत ते खूपच सकारात्मक आहेत. तुम्हाला जितके जास्त अँटीबॉडीज मिळतील, तितकी तुमची Omicron चा सामना करण्याची शक्यता जास्त आहे. आतापर्यंत ज्यांनी लसीचा बूस्टर शॉट घेतलेला नाही, त्यांची प्रयोगशाळेत चाचणी झालेली नाही.