त्वचेवर दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, हे तर ओमायक्रॉनचे संकेत?

काळजी घ्या! हयगय करू नका कारण प्रश्न आपल्या जीवाचा... ओमायक्रॉनसंदर्भात नवी माहिती समोर, पाहा काय सांगतोय अहवाल

Updated: Jan 14, 2022, 08:45 PM IST
त्वचेवर दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, हे तर ओमायक्रॉनचे संकेत?

मुंबई: जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. भारतातही ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.  ओमिक्रॉनचा प्रसार पाहता, ते डेल्टा प्रकारापेक्षा संसर्गासाठी असल्याचे मानले जाते.  डेल्टापेक्षा याचा धोका कमी आहे मात्र संसर्गाचा वेग जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. 

सर्दी खोकल्यासारखी लक्षणं हलक्यात घेऊ नयेत असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे. त्याची लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. थकवा, सांधेदुखी, थंड डोकेदुखी ही ओमिक्रॉनची 4 सुरुवातीची आणि सामान्य लक्षणं आहेत.

नाक वाहणे, शिंका येणे आणि घसा खवखवणे, भूक न लागणे, कोरडा खोकला हे देखील ओमायक्रॉनचे लक्षणं मानले जातात. नुकतेच स्कीनवरही ओमायक्रॉनची लक्षणं आढळून आली आहेत. 

ZOE Covid या स्टडी अॅपवर काही नवीन लक्षणं नोंदवण्यात आली आहेत. लाल डाग किंवा दादी अंगावर उठतात त्यामुळे खूप जास्त खाज येते. सुरुवातीला तळहात आणि तळपायापासून खाज यायला सुरुवात होते. ही खास काही तास ते काही दिवसांपर्यंत असू शकते. जर हे लक्षण तुम्हालाही असेल तर तुम्ही चाचणी करून घ्या किंवा डॉक्टरचा सल्ला घ्या. 

अंगावर पुरळं येतात. यामुळे अंगावर काळे डागही पडतात. ते हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतात आणि त्यांना सूज देखील येते. त्यानंतर त्यांना खाज सुटू लागते. कोपर, गुडघे आणि हात-पायांच्या मागच्या बाजूला असे काटेरी डाग पडणे सामान्य गोष्ट आहे. पण इतर ठिकाणी जर अशा प्रकरची पुरळं येत असतील तर डॉक्टरचा सल्ला घ्या.