मुंबई : अनेकांच्या चेहऱ्यावर छोटे-छोटे खड्डे (Open Pores) असतात. या खड्यांमुळे चेहरा खराब दिसत असतो. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास ही समस्या उद्भवत असते. चेहऱ्यावरील या खंड्यांपासून (Face Open Pores) पूर्णपणे मुक्त होणे सोपे नाही परंतु ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. यासाठी आम्ही तुम्हाला काही फेस पॅक सांगणार आहोत. हे फेस पॅक (Face Pack) वापरून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील खड्डे कमी करू शकतात. हे फेस पॅक कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.
'हे' फेस पॅक वापरा
पपईचा फेस पॅक (Face Pack) हा या समस्येवर खुप फायदेशीर आहे. पपईचा फेस पॅक (Face Pack)चेहऱ्यावर लावल्यास, तो त्वचेला खोलवर स्वच्छ करते, ऍक्सेस ऑइल काढून टाकते, ब्लॅकहेड्स काढून टाकते आणि खड्डेही (Open Pores) साफ करते. त्यामुळे चेहऱ्यावरील छोटे-छोटे खड्डे (Open Pores) लहान होऊ लागतात.
फेसपॅक (Face Pack) बनवण्यासाठी पपईचे 3 ते 4 तुकडे घ्या आणि मॅश करा. त्यात अर्धा चमचा मध आणि एक चमचे कच्चे दूध घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे ठेवा. हा फेस पॅक चेहऱ्याच्या खड्यांवर आठवड्यातून दोनदा लावता येतो.
ग्रीन टीचा फेस पॅक (Face Pack) देखील चेहऱ्यावरील खड्डे (Open Pores) बुजवण्यात मोठी भूमिका निभावतात. हा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावरचा ऍक्सेस ऑइल काढून टाकते आणि त्वचेची खड्डेही कमी करते. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी ते चेहऱ्यावर देखील लावले जाऊ शकते.
3 चमचे पाण्यात एक चमचा ग्रीन टी बनवा आणि 5 मिनिटे बाजूला ठेवा. यानंतर एक अंडे फोडून त्यात 2 चमचे बेसन मिसळा. हे पाणी अंड्याच्या मिश्रणात मिसळा आणि चेहऱ्याला लावा. 15 मिनिटांनी चेहरा धुवा.
बेसन आणि हळद घालून सर्वात सोपा आणि प्रभावी फेस पॅक (Face Pack) बनवता येतो. चेहऱ्यावरचे खड्डे (Open Pores) कमी करण्यासाठी हा फेस पॅक लावा. तुम्ही त्यात ऑलिव्ह ऑईलचे काही थेंबही टाकू शकता. ही पेस्ट 20 ते 25 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवा. तुम्हाला ओलावा जाणवेल, त्वचेवर चमक येईल.
जर तुम्ही आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक (Face Pack) लावल्यास, चेहऱ्यावरील खड्डे कमी होण्याची शक्यता आहे. एक चमचा बेसन घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा दही घालून फेस पॅक तयार करा.
दरम्यान हे तीन फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावरील खड्डे दुर करू शकता. त्यामुळे तुम्ही हे फेस पॅक वापरून पाहा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)