आपलं शरीरच आपल्या आजारांवर उपचार करते! कसं ते जाणून घ्या?

तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक आजारासाठी औषधोपचाराची गरज नसते. 

Updated: Aug 30, 2022, 06:52 PM IST
आपलं शरीरच आपल्या आजारांवर उपचार करते! कसं ते जाणून घ्या? title=

Amazing Facts About Body: 'आरोग्य धनसंपदा' या उक्तीतून आरोग्याचं महत्त्व अधोरेखित होतं. कारण आरोग्य व्यवस्थित असेल चांगलं जीवन जगता येतं. पण निरोगी आयुष्य प्रत्येकाच्या वाटेला येतंच असं नाही. एखादा आजार आयुष्यभर उशासी घेऊन जगावं लागतं. त्या आजारावर मात करण्यासाठी औषधं खावी लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक आजारासाठी औषधोपचाराची गरज नसते. आपलं शरीर देखली एका डॉक्टरप्रमाणे उपचार करू शकते. आपल्याकडे आपलं व्याधी बऱ्या करण्याची क्षमता आहे. शरीरात अनेक आजारांशी लढण्याची रोगप्रतिकार शक्ती असते. 

आपल्याला जखम झाली की त्यावर आपण मलमपट्टी करतो. पण आपल्याला दुखापत किंवा जखम होते, तेव्हा आपले शरीर त्यावर उपचार करू शकते. आपले शरीर टीश्यू दुरुस्त करणारे काही केमिकल्स सोडते. नवीन टीश्यू बनवून जखम भरून काढते. हाड मोडल्यावर लिगामेंट्स आणि टेंडन टीश्यू तयार करते. त्यामुळे हाड पुन्हा जोडण्यास मदत होते.  

प्रत्येक रोगाचे कारण शरीरात कोणत्या ना कोणत्या पोषक तत्वांची कमतरता असते. अशा परिस्थितीत आपण या पोषक घटकांचा आहारात समावेश केला पाहिजे जेणेकरून आपण आजार पळवून लावू शकतो. उदाहरणार्थ, जर आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर हाडांच्या समस्या सुरू होतात, जर व्हिटॅमिन एची कमतरता असेल तर दृष्टी कमजोर होऊ शकते. शरीर काही प्रमाणात या समस्या स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करते. भरपूर पोषक तत्वे घेऊन आपण शरीराला एक प्रकारे मदत करू शकतो. 

आपल्याला जेव्हा तहान लागते तेव्हा आपण स्वतः पाणी पितो, जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण अन्न खातो, ही शरीराची गरज असते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील त्याच प्रकारे कार्य करते.