'या' तेलामुळे Bad Cholesterol वाढत, ICMR म्हणतं तेल फायदेशीर पण हृदयसंबंधित आजारांची भीती

द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 'या' तेलामुळे Bad Cholesterol वाढत. एवढंच नाही तर हृदयसंबंधित आजारांची संभावना बळकावते. 

नेहा चौधरी | Updated: May 26, 2024, 11:34 AM IST
'या' तेलामुळे Bad Cholesterol वाढत, ICMR म्हणतं तेल फायदेशीर पण हृदयसंबंधित आजारांची भीती  title=
Cholesterol ICMR say

भारतीय जेवणात भरपूर प्रमाणात तेलाचा वापर केला जातो. भारतीय व्यजंन हे तेलाशिवाय बनू शकतं नाही असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. अनेक ठिकाणी तर जेवण्यात वरुन तेल घेऊन खाण्याची सवय...भाज्यांवर तर्री म्हणजे तेलाची एक लेअर नेसल तर त्याला भाज्याला चव नाही असं म्हणतात. पण आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांनुसार जास्त प्रमाणात तेलाच सेवन हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरतं. शिवाय तेलामुळे खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाणात वाढतं. त्याशिवाय भारतात अनेक प्रकारचे तेल वापरले जातात. शेंगदाणे, पाम, सूर्यफूल आणि सोयाबीन तेल वापरलं जातं. ICMR म्हण्यानुसार यातील एक तेल कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते. शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे नसा ब्लॉक होऊ हृदयाशी संबंधित आजाराचा धोका वाढतो. आम्ही पाल तेलाबद्दल बोलतोय ज्यापासून बिस्किटे, चिप्स, नमकीन आणि अनेक पदार्थ तयार करण्यात येतात. हे तेल आरोग्यासाठी हानिकारक ठरतं का जाणून घेऊयात. (palm oil raises Bad Cholesterol ICMR says oil is beneficial but fears heart related diseases)

पाम तेल कशापासून बनतं? 

पाम तेल पाम वृक्षांच्या फळांपासून तयार करण्यात येत असून ते एक खाद्य तेल आहे. ज्याचा वापर अन्न, चिप्स आणि बिस्किटं बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. पण जेव्हा हे तेल तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात जाते तेव्हा ते तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढण्यास कारणीभूत ठरतं. 

कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? 

कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा मेणासारखा चिकट पदार्थ असून त्याचे दोन प्रकार असतात. चांगले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल, ज्याला एलडीएल आणि एचडीएल असं वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं. पाम तेलाच्या अतिवापरामुळे हृदयाच्या नसांमध्ये खराब कोलेस्टेरॉल वाढतं आणि ज्यामुळे चरबी जमा होते. त्यामुळे रक्त प्रवाह आणि हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. 

पाम तेलामुळे हृदयाच्या आरोग्यालाही हानी?

द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार पाम तेल हे कोलेस्टेरॉलसाठी सर्वात वाईट तेलांपैकी एक मानलं गेलं आहे. यामध्ये असलेले सॅच्युरेटेड फॅट कोलेस्ट्रॉल वाढीस घातक ठरतो. याशिवाय पाम तेलाचा रक्तातील लिपिड्सवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अनेक पटींनी वाढतं, असं या अभ्यासातून सिद्ध झालंय. 

कोणते तेल वापरायचे?

जर तुम्हाला स्वतःला निरोगी ठेवायचं असेल किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर चुकूनही पाम तेलाचा वापर करु नका. त्याऐवजी, स्वयंपाकासाठी मोहरी आणि सूर्यफूल तेल वापरणं फायदेशीर ठरतं. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)