पोलिओमुक्त देशात 18 वर्षांनी परतला 'पोलिओ'

18 वर्षांपूर्वी पोलिओमुक्त घोषित केलेल्या पापुआ न्यू गिनी या देशामध्ये पुन्हा पोलिओ आढळला आहे. 

Updated: Jun 28, 2018, 02:40 PM IST
पोलिओमुक्त देशात 18 वर्षांनी परतला 'पोलिओ'  title=

पापुआ न्यू गिनी : 18 वर्षांपूर्वी पोलिओमुक्त घोषित केलेल्या पापुआ न्यू गिनी या देशामध्ये पुन्हा पोलिओ आढळला आहे. WHO ने याबाबत घोषणा करण्यात आली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार पापुआ न्यू गिनीमध्ये मोरोब, मैडांग आणि ईस्टर्न हाईललॅन्ड्स या तीन भागांमध्ये पोलियोचे व्हायरस आढळले आहेत. या देशाचे आरोग्यमंत्री पुका टेमू यांनी देशात पुढील 13 महिने हेल्थ इमरजन्सी घोषित केली आहे. 

जागतिक आरोग्य संस्था (WHO)ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यामध्ये सहा मुलांमध्ये पोलियोचे व्हायरस आढळले. अशाप्रकारचे व्हायरल इंफेक्शन काही विशिष्ट भागातील मुलांमध्ये आढळले आहे.