Piles Diet Plan: मुळव्याधीने त्रस्त असाल तर 'हाच' डाएट प्लॅन वापरा...चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

(diet for piles) अ‍ॅन्टीऑक्सिडंटयुक्त पदार्थांमुळे मूळव्याधीची लक्षण कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वेदना, खाज येणे, शौचावाटे रक्त पडणं हा त्रास कमी होतो. 

Updated: Jan 9, 2023, 01:33 PM IST
Piles Diet Plan: मुळव्याधीने त्रस्त असाल तर 'हाच' डाएट प्लॅन वापरा...चुकूनही खाऊ नका हे पदार्थ  title=

diet plan for piles: काही आजार सांगणं कठीण होऊन बसतं, आणि न सांगता राहू शकत नाही असाच एक आजार म्हणजे मूळव्याध. मूळव्याधीचा त्रास (piles solution) खूपच अशक्य असतो. हा त्रास विशिष्ट टप्प्यानंतर गंभीर रूप धारण करते. मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवायचा असेल तर आहाराचे पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. औषधोपचार, घरगुती उपाय यासोबतच तुम्ही  नियमित कशाप्रकारे डाएट फॉलो करता यावरही मूळव्याधीच्या समस्येची गंभीरता अवलंबून असते. 

फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश वाढवा 

मूळव्याधीचा त्रास जडण्यामागे आणि अधिक त्रास होण्यामागे तुमचे डाएट फार महत्त्वाची भूमिका बजावते. हा त्रास आटोक्यात ठेवायचा असेल तर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे पचनसंस्थेच्या कार्यातील बिघाड कमी होण्यास मदत होते. याकरिता बारली, ओट्स, पालक, मेथी यासरख्या हिरव्या पालेभाज्या, संत्र यासरख्या फळांचा आहारात समावेश करा. 

अ‍ॅन्टीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ  

आहारात अ‍ॅन्टीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. यामुळे टिश्यु, लिगामेंट्स मजबूत होतात. अ‍ॅन्टीऑक्सिडंटयुक्त पदार्थांमुळे मूळव्याधीची लक्षण कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वेदना, खाज येणे, शौचावाटे रक्त पडणं हा त्रास कमी होतो. 
चेरीज, ब्लॅकबेरीज, सायट्र्स फळं यांचा आहारात समावेश केल्याने शरीराला अ‍ॅन्टीऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा पुरवठा होतो. 

मुबलक पाणी प्या 

नियमित मुबलक पाण्याचं सेवन करणं आवश्यक आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी मुबलक पाणी पिणं गरजेचे आहे. यामुळे आतड्यांचे नाजूक सेल्सचं आरोग्य जपता येते. सोबतच पचनसंस्थेचे कार्य सुधारते. 

आहारतज्ञांनी दिलेला खास डाएट प्लॅन 

सकाळी उठल्यावर रात्रभर भिजवलेल्या मनुकांनी दिवसाची सुरूवात करा. 

ब्रेकफास्टला मेथी पराठा आणि सोबत ग्लासभर दूध प्यावे.  

नाश्ता आणि दुपारच्या जेवणादरम्यान भूक लागल्यास एखादं केळ किंवा वाटीभर पपई, टरबूज खाऊ शकता. 

दुपारच्या जेवणामध्ये सलाड, ब्राऊन राईस, डाळ, आणि ग्लासभर ताक पिऊ शकता. यासोबतच मांसाहारांसाठी वाफवलेला मासा फायदेशीर ठरू शकतो. 

संध्याकाळी एखादं संत्र, वाटीभर द्राक्ष किंवा स्ट्रॉबेरी यांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरू शकते. 

रात्रीच्या जेवणामध्ये वाटीभर सलाड, फुलके, पालक किंवा मेथीची भाजी, छास यांचा समावेश करा. फार मसालेदार किंवा तळकट पदार्थांचा आहारात समावेश करण्याऐवजी वाफवलेल्या माश्यांचे पदार्थ यांचा आहारात समावेश वाढवा. 

आहारतज्ञांनी सुचवलेल्या या डाएट प्लॅन सोबत नियमित किमान आठ ग्लास पाण्याचे सेवन करणं आवश्यक आहे. लिंबूपाणी, शहाळ्याचं पाणी यांचाही आहारात समवेश करणं फायदेशीर ठरू शकते.