मुंबई : डाळिंब फळाचे अनेक फायदे आहेत. डाळिंब ज्युस पिल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होत असतात. एक तर तुमचं पचन सुधारतं हे सर्वात महत्वाचं आहे, आणि पचन सुधारल्याने शरीराला सर्व बाजूने ते फायदेशीर आहेत.
डाळिंब ज्यूस किंवा डाळिंब खाल्ल्याने शरीरातील श्युगर लेव्हल मेन्टेन राहते, इतर फळांप्रमाणे तिची पातळी वाढत नाही. शरीरातील श्युगर संतुलित करण्याचं कामंही डाळिंब करतं.
डाळिंबामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते, एवढंच नाही तर हिरड्या मजबूत करून दातांची दुर्घंधी घालवण्यासही मदत होते.
डाळींबातील औषधी तत्व हृदय, पोट, यकृत यांचं कार्य व्यवस्थित चालण्यास मदत करतात. डाळिंब खाल्ल्याने भूक लागण्याचे प्रमाण वाढते, वजन कमी करण्यासही डाळिंब ज्युस महत्वाचा ठरतो, उन्हाळ्यात डाळिंब ज्यूस अधिक महत्वाचा ठरतो. तहान कमी करतो. पचनशक्ती वाढते. त्वचा निरोगी राखण्यासही डाळिंब महत्वाची भूमिका बजावतं.