पोस्ट कोविडनंतर या वयोगटातील रुग्णांना हृदयाची समस्या, काळजी घेण्याबाबत डॉक्टरांचा हा सल्ला

पोस्ट कोविड रूग्णांमध्ये हृदयाशी संबंधित अडचणींमध्ये तीव्र वाढ झाल्याचे दिसून येते. 50 वर्षांवरील वयोगटामध्ये श्वासोच्छवासाची समस्या, छातीत दुखणे, अचानक धडधडणे, (एरिथिमियस, विकृती) यासह दीर्घकालीन ह्रदयाचा त्रास होतो.  

Updated: May 15, 2021, 06:27 PM IST
पोस्ट कोविडनंतर या वयोगटातील रुग्णांना हृदयाची समस्या, काळजी घेण्याबाबत डॉक्टरांचा हा सल्ला title=
संग्रहित फोटो

मुंबई : पोस्ट कोविड रूग्णांमध्ये हृदयाशी संबंधित अडचणींमध्ये तीव्र वाढ झाल्याचे दिसून येते. 50 वर्षांवरील वयोगटामध्ये श्वासोच्छवासाची समस्या, छातीत दुखणे, अचानक धडधडणे, (एरिथिमियस, विकृती) यासह दीर्घकालीन ह्रदयाचा त्रास होतो. हृदयाचा ठोका), जळजळ होण्याचे प्रमाण वाढणे आणि पोस्ट कोविड कालावधीत हृदयविकाराचा झटका, हृदयाची पंपिंग क्षमता कमी अधिक होणे आदी समस्या दिसून येतात. हृदयविकाराच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊन गुतांगूत आणखी वाढू शकते.

पोस्ट कोविडनंतरच्या काळात नियमितपणे हृदय तपासणी करणे अतिशय आवश्यक आहे. कोरोना व्हायरस हा  केवळ आपल्या फुफ्फुसांवर, मेंदूवरच नव्हे तर हृदयावर देखील परिणाम करते. एका 45 वर्षीय व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्यानंतर एका महिन्याने  छातीत दुखणे आणि श्वास लागणे आदी समस्या उद्भवू लागल्या आणि त्यानंतर त्या व्यक्तीने उपाचाराकरिता अपोलो क्लिनीक येथे धाव घेतली. तपासणी दरम्यान करण्यात आलेल्या ईसीजी चाचणी हृदयविकाराच्या झटक्याने या व्यक्तींला अशा प्रकारची समस्या उद्भवत असल्याचे दिसून आले. त्या व्यक्तीने अ‍ॅस्पिरिन घेणे बंद केले होते. त्याच्या इकोकार्डिओग्राफीने हृदयाच्या कार्याची चाचणी करण्यात आली. त्या रुग्णावर त्वरीत उपचार करुन त्याची अ‍ॅंजिओप्लास्टी करण्यात आली. रुग्णाच्या दोन्ही धमनीवर यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी करुन दोन दिवस रुग्णाला अतिदक्षता विभागात देखरेखेखाली ठेवण्यात आले. त्यानंतर रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्याच्यासारखे बरेच रुग्ण आहेत, ज्या अशा प्रकारे पोस्ट कोविडनंतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

 पोस्ट कोविड लक्षणे

 कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर, न्युमोनिया आणि फुफ्फुसांच्या संसर्गामुळे 30 ते 50 वर्षे वयोगटातील रूग्णाला श्वास घेण्यात अडचणी, दम लागणे आणि खोकला तसेच –हदयाच्या समस्या दिसून आल्या. कोविडची लागण होण्यापुर्वी निरोगी असलेल्या व्यक्तींमध्येही गंभीर प्रकारची पोस्ट कोविड लक्षणे, -हदयासंबंधी विकार आदी समस्या दिसून येऊ लागल्या आहेत. यामध्ये उच्च रक्तदाब,  किरकोळ पॅल्पिटेशन, गंभीर जीवघेणा एरिथमिया, हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, तीव्र फुफ्फुसीय रोग होण्यापर्यंतचा असू शकतो, अशी माहिती पुण्यातील अपोलो  क्लिनिकचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रमोद नरखेडे यांनी दिली. 

कोविड संसर्गातून बरे झाल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अशा समस्या दिसून येतात. ह्रदयाच्या ओपीडीमध्ये भेट देणार्‍या 10 पैकी 5 रुग्णांना –हदयासंबंधी तक्रारी उद्भवत असल्याचे दिसून येते. ज्यांना आधीच ह्रदयाच्या समस्या आहेत त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

हृदयाचे नुकसान होण्यामागील कारण...

 हृदयाचे नुकसान होण्यामागील कारण एखाद्याच्या शरीरात पसरलेला संसर्ग ज्यामुळे हृदयासह काही निरोगी ऊतींचे नुकसान होते. कोविड संसर्गामुळे रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या स्नायूंवर विपरीत परिणाम होतात. ज्यामुळे हृदय आणि शरीराच्या इतर भागात रक्तप्रवाहास अडथळे निर्माण होतात. चक्कर येणे, डोकेदुखी होणे, अचानक धडधडणे, उच्च रक्तदाब, उलट्या होणे, घाम येणे आणि श्वास लागणे, छातीत दुखणे यासारखे लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. प्रमोद नरखेडे यांनी सांगितले.

हृदयाची काळजी घेण्यासाठी एवढेच करा...

लवकर निदान आणि त्वरित उपचार मृत्यू दर कमी करण्यास मदत करेल. आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी, फायबर आणि प्रथिनेयुक्त आहार घ्या. यात ताजी फळे, भाज्या, धान्य, शेंगदाणे, आणि डाळी यांचे सेवन करावे. मसालेदार, तेलकट, प्रक्रिया केलेले किंवा जंकफूड खाऊ नका. उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचे नियमितपणे परीक्षण करून त्याचे योग्य व्यवस्थापन करा. दररोज व्यायाम करा, योग्य वजन राखा, अल्कोहोल आणि धूम्रपानचे सेवन करणे टाळा. कोविडनंतर, हृदयाच्या कार्यप्रणालीवर नजर ठेवण्यासाठी रूग्णांनी ईसीजी, इको सारख्या ह्रदयाच्या तपासणी करुन घ्या, असेही आवाहन नरखेडे यांनी केले.