Garlic Benefits: रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे फायदेशीर का आहे? या आजारांपासून संरक्षण मिळेल

Raw Garlic:  लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो. कारण त्याच्या मदतीने आपण अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतो. पोषण तज्ञाकडून जाणून घ्या त्याचे फायदे काय आहेत.

Updated: Oct 7, 2022, 04:24 PM IST
Garlic Benefits: रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे फायदेशीर का आहे? या आजारांपासून संरक्षण मिळेल title=

Garlic Benefits : स्वयंपाकाची चव वाढावी, यासाठी फोडणीमध्ये लसणाचाही वापर केला जातो. लसणामुळे अन्नपदार्थ चविष्ट होण्यास मदत मिळते. लसूणमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. यातील पोषक घटकांमुळे कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणून ओळखलं जातं. यामुळे आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश करावा. पण सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं तुमच्या शरीराला सर्वाधिक लाभ मिळतात.  

लसूण हा असा मसाला आहे जो भारतातील जवळपास प्रत्येक घरात असतो. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे अनेक रोग आणि संक्रमणाचा धोका टळतो. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ञ निखिल वत्स यांच्या मते, लसूण सकाळी रिकाम्या पोटी खाणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया लसणाचे फायदे...

रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे

1. कर्करोग प्रतिबंध
लसणात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कर्करोगजन्य गुणधर्म असतात. त्यामुळे सकाळी काहीही न खाता लसूण चघळल्यास कर्करोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

2. मधुमेहामध्ये उपयुक्त
लसणामध्ये अॅलिसिन नावाचे एक संयुग असते. जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या ४ पाकळ्या खाव्यात.

3. वजन कमी करा
जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्या तर तुमचे वजन झपाट्याने कमी होईल. त्यात असे काही संयुगे आढळतात जे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत करतात.

4. नैराश्य दूर होईल
लसणाचे सेवन मानसिक आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे. त्याच्या मदतीने आपले मन संतुलित राहते आणि नैराश्याशी लढण्याची ताकद मिळते. तणाव टाळण्यासाठी अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

 

 

(Disclaimer:  येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी, कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS NEWS याची पुष्टी करत नाही.)