Hair Growth Foods: केस वाढवण्यासाठी काय खावे? हे 5 हेल्दी फूड्स फायदेशीर

Food For Long Hair: केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांची वाढ वाढवण्यासाठी, महिला सर्व प्रकारचे सौंदर्य उत्पादने तयार करतात. परंतु जर त्यांनी काही आरोग्यदायी आहार घेतला तर त्यांचे केस लांबसडक आणि चांगले होतील

Updated: Oct 7, 2022, 02:54 PM IST
Hair Growth Foods: केस वाढवण्यासाठी काय खावे? हे 5 हेल्दी फूड्स फायदेशीर   title=

Hair Growth Diet For Female: अनेकांना आपल्या केसांची चिंता असते. केस वाढविण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जातात. मात्र, कोणतेही औषध उपचार न करता आहारातून केस चांगले ठेवू शकता. महिलांसाठी केस वाढवणारा आहार घेतला तर तो फायदेशीर ठरतो. बहुतेक महिलांना त्यांचे केस लांब, मजबूत असावेत असे वाटते. जाड आणि चमकदार व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. केसांची वाढ मंदावते. आजकाल प्रदूषण, धूळ आणि मातीमुळे केस निरोगी ठेवणे कठीण झाले आहे. चला जाणून घ्या ते कोणते पदार्थ आहेत, ज्यांच्या सेवनाने तुम्ही केस लांबच नाही तर ते मजबूत देखील करु शकता.

लांब केसांसाठी या गोष्टी खा

1. एवोकॅडो
एवोकॅडो हे खूप पौष्टिक फळ आहे, याच्या सेवनाने केस मजबूत होतात. या फळामध्ये व्हिटॅमिन ई आढळते, जे केसांचे आरोग्य राखण्यास आणि ते लांब करण्यास मदत करते.

2. गाजर
गाजर ही एक अशी भाजी आहे जी जमिनीच्या आत उगवते. ज्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन ए विशेषत: आढळते. जे डोक्याच्या पेशींच्या वाढीस मदत करते आणि केसांना चमकदार बनवते.

3. मासे
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी मासे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यामध्ये बायोटिन आढळून येते, ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. केसगळती तर दूर होतेच पण केस लांब आणि मजबूत होतात.

4. अंडी
सामान्यतः प्रथिने मिळविण्यासाठी आपण अंडी खातो. त्यात बायोटिन, व्हिटॅमिन डी3, व्हिटॅमिन बी आणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड देखील असतात, ज्यामुळे केसांच्या वाढीचा वेग वाढतो. खाण्याव्यतिरिक्त केसांना अंडी लावल्यानंतर डोके धुणे देखील फायदेशीर आहे.

5.ड्राय फ्रुट्स
 ड्रायफ्रुट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु याद्वारे आपण केस मजबूत करू शकतो आणि त्यांची वाढ करु शकतो. तुम्ही बदाम, अक्रोड आणि काजू यांसारखा मेवा नियमितपणे खाऊ शकता.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)