Health News : बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) दर दिवसाआड आरोग्यासंबंधी अनेक तक्रारी सतावू लागल्या आहेत. हे दर दुसऱ्या व्यक्तीचं रडगाणं. मुळात शरीर थकतं आणि त्यालाही विश्रांतीची गरज असते असंच आपण या शर्यतीमध्ये विसरत चाललो आहोत असं म्हणणं हरकत नाही.
आज माझे हात दुखताहेत, आज काय तर पाय दुखताहेत... असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. यातही रात्रीच्या वेळी पाय दुखी सतावतेय अशी तक्रार करण्याची संख्या तुलनेनं जास्त. यामागची कारणं तुम्हाला माहितीयेत? (reason behind legs pain in night)
- प्लँटर फॅसिसीटीज
पायाच्या पुढील भागापासून खोटेपर्यंत जाणाऱ्या भागाला प्लँटर फॅसिसीटीज असं म्हणतात. ज्यावेळी या भागावर जास्त जोर पडतो तेव्हा पाय दुखू लागतो. तुमचीही खोट दुखत असल्यास हा त्रास नाकारता येत नाही.
- मॉर्टन्स न्यूरोमा
ही एक अशी तक्रार आहे, ज्यामध्ये पायांच्या बोटांवर सूज जाणवते. यामुळं बोटांमध्ये जळजळ आणि वेदनाही जाणवतात. अनेकदा हे दुखणं पूर्ण दिवस किंवा रात्रीच्या वेळी बळावतं.
- गर्भावस्था (Pregnancy)
गर्भधारणा झालेल्या अनेक महिलांना पायदुखीचा त्रास सतावतो. शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमीजास्त होत असल्यामुळं रात्रीच्या वेळी या वेदना अधित तीव्र होतात.
- डायबिटीज (diabetes)
रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत असल्यास शरीरातील नसांवर त्याचे थेट परिणाम होतात. यामध्ये पायांच्या नसाही समाविष्ट असतात. अशा परिस्थितीत रात्री पाय दुखण्याचं प्रमाण वाढतं.
- नसांवर ताण येणं
पायांच्या नसांवर ताण येतो तेव्हाही वेदना सुरु होतात. ज्यावेळी पाय सपाट पृष्ठावर पडतात तेव्हा नसांना आराम मिळतो आणि वेदना जाणवू लागतात.
- पायांचा नैसर्गिक आकार (Shape of legs)
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण पायांचा नैसर्गिक आकारही अनेकदा वेदनांचं कारण ठरतो. बऱ्याचदा शरीराचं वजन वाढल्यामुळं शरीराचा सर्व भार पायांवर येतो आणि त्यामुळं असह्य वेदना जाणवू लागतात.
रात्रीच्या वेळी पायांमध्ये सहसा वरील कारणांमुळे वेदना होतात. अशा वेळी घाबरून न जाता वेदना वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सोबतच सतत पाणी पिण्याला प्राधान्य द्यावं. यामुळं शरीरातील द्रव पदार्थ अपेक्षित प्रमाणात प्रवाहित राहतात. काही तासांनी हातापायांचे सोपे व्यायाम करावेत. असं केल्यामुळं नसा मोकळ्या होतात. वेदना जास्त असल्यास बर्फाचा शेक देणंही फायद्याचं ठरतं.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भाच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)