.. म्हणून बीयर हिरव्या किंवा चॉकलेटी रंगाच्या बाटलीमध्येच ठेवली जाते

जगभरात विविध पार्ट्यांमध्ये हमखास बीयरचा समावेश असतो. पाणी, चहा नंतर तिसरे लोकप्रिय पेय म्हणजे 'बीयर'.

Updated: Mar 16, 2018, 06:54 PM IST
.. म्हणून बीयर हिरव्या किंवा चॉकलेटी रंगाच्या बाटलीमध्येच ठेवली जाते  title=

मुंबई : जगभरात विविध पार्ट्यांमध्ये हमखास बीयरचा समावेश असतो. पाणी, चहा नंतर तिसरे लोकप्रिय पेय म्हणजे 'बीयर'.

काही मेडिकल रिपोर्ट्सनुसार, बीयर काही विशिष्ट प्रमाणात घेतल्यास त्याचा आरोग्यदायी फायदा होतो. 

बीयर  हिरव्या किंवा चॉकलेटी रंगाच्या बाटलीत का भरलेली असते ?

बीयर पूर्वी पारदर्शक ग्लासमधून दिली जात असे. मात्र सूर्यकिरणाशी त्याचा संपर्क आल्यास त्याची चव आणि वास बदलत असे. बदललेल्या उग्र वासाच्या बीयरचं सेवन करणं अनेकदा लोकांना आवडत नसे. 

रंगीत बाटल्यांमध्ये बीयर अधिक सुरक्षित  

रंगीत म्हणजेच गडद रंगाच्या बाटलीमध्ये प्रामुख्याने चॉकलेटी रंगाच्या बाटलीमध्ये बीयर भरल्यास त्या अधिककाळ टिकवणं सुकर होऊ लागले. या रंगीत बाटल्यांवर सूर्यकिरणांचा दुष्परिणाम दिसत नाही. त्यामुळे बीयर अशाच बाटल्यांमध्ये साठवली जाते.  

बाटलीचा रंग बदलला 

सुरूवातीला बीयर केवळ चॉकलेटी रंगाच्या बाटलीत भरली जात असे मात्र त्या बाटलीचा तुटवडा पडायला लागल्यानंतर हिरव्या रंगाच्या बाटलीचा समावेश करण्यात आला आहे.