महिलांंच्या आहारात कसुरी मेथी या '5' कारणांसाठी वरदान

भारतीय मसाले हे आपल्या खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. 

Updated: Jul 1, 2018, 05:16 PM IST
महिलांंच्या आहारात कसुरी मेथी या '5' कारणांसाठी वरदान  title=

मुंबई : भारतीय मसाले हे आपल्या खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. मात्र त्याचा वापर केवळ पदार्थ स्वादिष्ट करण्यासाठी सीमित नसतो. मसाल्याच्या पदार्थांमध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे कसुरी मेथी ! केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर कसुरी मेथी आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. आयुर्वेदामध्ये त्याचे खास औषधी गुणधर्म नमूद करण्यात आले आहेत.  

पोटातील इंफेक्शन  - 

पोटात गॅस  होणं, पचनाचे आजार होणं, पोटातील इंफेक्शन आटोक्यात ठेवण्यासाठी कसुरी मेथी फायदेशीर राहते. हृद्याचे विकार, गॅस्ट्रिक आजार तसेच आतड्यांच्या आरोग्यासाठीदेखील ते फायदेशीर आहे. 

स्तनपान देणार्‍या आईचे दूध वाढवते - 

स्तनपान देणार्‍या आईसाठी कसुरी मेथी अत्यंत फायदेशीर आहे. नवमातांच्या शरीरात दूध वाढवण्यासाठी कसुरी मेथी मदत करते. कसुरी मेथीमधील काही कम्पाऊंड्स नैसर्गिकरित्या नवमातांमधील दूध वाढवण्यास मदत करते. 

रक्त वाढवते 

महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचा त्रास प्रामुख्याने आढळतो. शरीरात रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया. अशावेळेस आहाराचे पथ्यपाणी सांभाळल्यास, त्यामध्ये सकारात्मक बदल केल्यास रक्त वाढवता येते. कसुरी मेथीच्या समावेशाने रक्त वाढवण्यास मदत होते. 

हार्मोनल बदल नियंत्रणात 

शरीरात होणारे हार्मोनल बदल नियंत्रणात ठेवण्यास तसेच त्यापासून होणारे त्रस आटोक्यात ठेवण्यास मदत होते. 

मधुमेहींना फायदेशीर 

मेथीच्या दाण्यांप्रमाणेच कसुरी मेथीदेखील मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. कसुरी मेथी टाईप 2 मधुमेहीच्या रूग्णांच्या शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.