भीषण गरमीने बेहाल झालात? ऋजुता दिवेकरने सांगितला स्वस्त पदार्थांचा उपाय

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पोट आतून थंड असणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितले 3 स्वस्त पर्याय. अवघ्या 10 रुपयात मिळेल गारवा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 29, 2024, 04:32 PM IST
भीषण गरमीने बेहाल झालात? ऋजुता दिवेकरने सांगितला स्वस्त पदार्थांचा उपाय title=

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पोट आतून थंड असणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितले 3 स्वस्त पर्याय. अवघ्या 10 रुपयात मिळेल गारवा. 

सूर्य दिवसेंदिवस सर्वात जास्त आग ओकत आहे. यामुळे उन्हाचा त्रास नागरिकांना जास्त जाणवतोय. एसी, कूलर, पंखे सगळ्या गोष्टी या उन्हासमोर फेल होत आहे. असं असताना शरीर आतून थंड आणि गारेगार राहण्यासाठी काय करावं कळत नाही. उन्हामुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. 

अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला खास उपाय. हा उपाय ऋजुताने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ऋजुताने अतिशय स्वस्त आणि उत्तम पर्याय सुचवला आहे. ज्यामुळे पोटातील आग शांत होऊ शकते. 

ऋजुता दिवेकर Summer Tips 

ऋजुता दिवेकरने काही स्थानिक आणि पारंपारिक गोष्टी खाण्यावर येथे भर दिला आहे. ज्याद्वारे उष्णतेवर मात केली जाऊ शकते, तुम्ही एसी न चालवता स्वतःला आणि शरीराला आतून थंड ठेवू शकता. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, निरोगी पर्याय शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. तुम्हाला पोट फुगणे, आम्लपित्त, थकवा, झोप न लागणे, डोकेदुखी, उन्हाळ्यात भूक न लागणे असे वाटत असेल तर तुम्ही या गोष्टींनी स्वतःला थंड करू शकता.

ताडगोळा

ताडगोळा हा एक स्थानिक आणि पारंपारिक असे फळ आहे. जे शरीराला थंड ठेवण्यासाठी खाल्ले जातात. त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात फायबर असते. हे पोट आणि मनाला थंड आणि शांत करते. नारळाचे पाणी जसे थंड असेच ताडगोळे देखील. त्यामुळे या पदार्थांचा समावेश करा.

दही भात

उन्हाळ्यात लोक सहसा दुपारचे जेवण टाळतात कारण उष्णता इतकी जास्त असते की एखाद्याला काहीही खाणे किंवा प्यावेसे वाटत नाही. अशा परिस्थितीत दुपारच्या जेवणात काहीतरी थंड आणि हलके खावे. यासाठी दही आणि मीठ मिसळून थंड भात खा, तुमच्या शरीरासाठी किंवा पोटासाठी यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. तांदूळ आणि दही यांचे मिश्रण प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे. थकवा आणि सुस्तीपासूनही तुम्हाला आराम मिळेल. रात्रीच्या जेवणानंतर घेणे चांगले. याची चव तुम्हाला आवडत नसली तरी उन्हाळ्यात ते तुमचे आरोग्य वाढवू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गुलकंद पाणी

गुलकंद हा अतिशय थंड पदार्थ आहे. जर तुम्ही गुलकंदाचा वापर करुन पाणी तयार केले तर त्याचा शरीर थंड ठेवण्यास फायदा होतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी गुलकंद पाणी पिऊन झोपा. यामुळे फायदा होतो. रात्रीच्या जेवणानंतर गुलकंद पाणी घेणे चांगले. याची चव तुम्हाला आवडत नसली तरी उन्हाळ्यात ते तुमचे आरोग्य वाढवू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.