ऋजुता दिवेकर सांगतेय, Weight Loss करताना ३ प्रकारचे अ‍ॅटिट्युड टाळा

Rujuta Diwekar Weight Loss Tips : ऋजुता दिवेकर कायमच आपल्या इन्स्टाग्रामवर हेल्थ टिप्स शेअर करत असते. यावेळी वजन कमी करताना कोणत्या ३ चुका टाळाव्यात हे ऋजुता सांगते. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 27, 2023, 11:50 AM IST
ऋजुता दिवेकर सांगतेय, Weight Loss करताना ३ प्रकारचे अ‍ॅटिट्युड टाळा title=

Rujuta Diwekar Health Tips :  वजन कमी करणे, फिट राहणे असा प्रत्येकाचाच हट्ट असल्याच दिसत आहे. पण नेमकं काय करायचं, किती करायचं आणि कसं करायचा हा प्रश्न असतोच. अशावेळी ऋजुता दिवेकर कायमच हेल्थ टिप्स शेअर करत असते. 

लठ्ठपणा आणि त्यामुळे जडणारे इतर आजार हे केंद्रस्थानी आहेत. अनेक लोक लठ्ठपणाने ग्रासले आहेत. अशावेळी निरोगी आरोग्यासाठी काय करावे, यावर ऋजुता दिवेकर मार्गदर्शन करते. ऋजुता दिवेकरने वजन कमी करताना ३ टिप्स म्हणजे ३ पद्धतीचा अ‍ॅटिट्युड टाळायला सांगितला आहे. ज्यामुळे वजन कमी करताना अडथळा निर्माण होतो आणि वजन कमी करण्याच्या प्रवासात खंड पडतो. 

पूर्ण डाएट खराब करू नका

वेटलॉस करताना एक शिस्तबद्धता हवीच. पण जर तसे एखाद दिवशी झाले नाही तर संपूर्ण डाएट खराब करू नका. एखादा मिल बाहेर खाल्ला किंवा आईस्क्रिम खाल्लं तर दिवसभरातील इतर डाएट नक्की फॉलो करा. कारण वजन कमी करण्याचे सातत्य महत्वाचे आहे. कारण असे न केल्यास तुमची चिडचिड होईल आणि याचा परिणाम शरीरावर होईल. नाराज होऊ नका स्वतःला दोष देऊ नका. एक मिल चिट मिल झालं तरी इतर डाएट व्यवस्थित फॉलो करा. 

एक्सरसाइज टाळू नका 

व्यायामाकरिता दिवसभरातील ६० मिनिटे देणे आवश्यक असते. पण जर असे कधी झाले नाही तर संपू्र्ण एक्सरसाइज टाळू नका. अगदी १० मिनिटे का होईना पण व्यायाम करा. कारण व्यायाम होणे त्यामध्ये सातत्य असणे अत्यंत गरजेचे आहे. 

कसे दिसता विचारू नका 

अनेकदा वेट लॉसच्या जर्नीमध्ये आपण सतत घरच्यांना आपण कसे दिसतो असे विचारत राहतो. खास करून आपल्या नवऱ्याला. अशावेळी ते न करता आपला प्रवास सुरूच ठेवा. कारण सतत कुणाला ना कुणाला विचारून आपल मन नाराज करू नका. 

स्वतःला सपोर्ट करा 

वजन कमी करणे हा ह्ट्ट नाही एक प्रवास आहे. अशावेळी सातत्य महत्वाचं आहे आणि मन प्रसन्न राहणे गरजेचे आहे. स्वतःला या प्रवासात सपोर्ट करा आणि आनंदी राहा. वजन कमी करताना कोणताही अट्टाहास नको कारण हा प्रवास आहे तुमचा मुक्काम नाही. तसेच स्वतःवर, शरीरावर मनापासून प्रेम करा.