मुंबई : कोजागिरीसाठी (Kojagiri Pournima 2022) जर तुम्ही केशर घातलेलं दूध (Kesar Milk) पिणार असाल तर सावधान. कारण तुमच्या दुधात मिसळलेलं केशर हे नकली असू शकतं. पाहुयात एक रिपोर्ट. (saffron in masala milk can be fake know How to recognize fake saffron)
कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही केशर घातलेलं सुगंधित मसाला दूध सेवन करत असाल तर सावधान. या मसाला दुधातील केशर बनावट असू शकतं. दिल्लीतून आलेल्या नकली केशरनं बाजारात शिरकाव केलाय. नकली केशरमध्ये ओरिजनल केशरचे काही तंतू असतात आणि बाकीचे मक्याच्या कणसाचे तंतू मिसळलेले असतात. तसं पाहायला गेलं तर 1 ग्रॅम केशरची किंमत 350 रुपये असते पण संशय येऊ नये म्हणून ते ओरिजिनल केशरच्याच किंमतीत विकलं जातंय. बनावट किंवा नकली केशर कसं ओळखाल. पाहुयात.
नकली केशरमध्ये ओरिजनल केसरचे थोडे तंतू असतात. दुधात टाकलं तर नकली केशराचा रंग जातो. नकली केशर असेल तर सोनेरी किंवा लाल रंग दुधात पसरतो. त्यामुळे तुम्हीही केशर खरेदी करत असाल तर सावधान.. तुम्ही खरेदी केलेलं केशर बनावट असू शकतं. त्यामुळे केशर खरेदी करताना खबरदारी घ्या.