पुन्हा मास्क लावण्यास सुरुवात...; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दिवसागणिक कोरोनाच्या रूगणांची संख्या वाढताना दिसतेय.

Updated: May 30, 2022, 06:37 AM IST
पुन्हा मास्क लावण्यास सुरुवात...; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान title=

मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका कमी होताना दिसत नाहीये. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दिवसागणिक कोरोनाच्या रूगणांची संख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे अशा भागातील नागरिकांनी मास्क लावण्यासोहत सावधगिरी बाळगली पाहिजे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, रविवारी महाराष्ट्रात कोविड-19 चे 550 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी देखील राज्यात 529 नवीन रुग्ण आढळले, यामध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही. राज्यात मास्क घालण्याची सक्ती गेल्या महिन्यातच रद्द करण्यात आली होती.

आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात प्रथमच कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सब-व्हेरिएंट बी.ए. 4 आणि बी.ए. 5 यांच्याही रूग्णांची नोंद झाली आहे. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यांनी शनिवारी माहिती दिली की, कोरोनाते रुग्ण वाढत असले तरी संसर्गामुळे कमी लोकांना जीव गमवावा लागतोय.

ते पुढे म्हणाले, “ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं दररोज वाढतायत त्या जिल्ह्यांतील लोकांनी मास्क घालण्यासह अतिरिक्त खबरदारी घ्यावी. दैनंदिन केसेस वाढत आहेत, पण आता नियंत्रणात आहे.