मुंबई : सध्या यंग जनरेशनमध्ये पियर्सिंग करण्याची फॅशन दिसून येते. मात्र ब्राझीलमध्ये पियर्सिंग करणं एका तरूणीच्या चक्क जीवावर बेतलं आहे. ब्राझीलमध्ये 15 वर्षीय इज़ाबेला एडुआर्डा डी सूसाने घरच्या घरी पिअर्सिंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यानंतर तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
द सनच्या रिपोर्टनुसार, 15 वर्षीय इसाबेलाला पिअर्सिंग केल्यानंतर गंभीर संसर्ग झालं. या संसर्गानंतर इसाबेलाचा चेहरा एका फुग्याप्रमाणे सुजला होता. त्याचप्रमाणे तिचा डोळाही सुजला होता. यानंतर तिला तिचा जीवही गमवावा लागला.
ब्राझीलच्या दक्षिण-पूर्व राज्य मिनस गेरॅसमध्ये इसाबेलाने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने पिअर्सिंग केलं होतं. इसाबेलाने यापूर्वी तिच्या आईकडे पिअर्सिंग करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनी यासाठी नकार दिला होता.
कुटुंबाने नकार दिल्यानंतर तिने मैत्रिणीसोबत घरीत पिअर्सिंग करून घेतलं. मात्र यानंतर तीन दिवसांनी तिला फार चिंताजनक लक्षणं दिसून आली. यावेळी तिच्या डोळ्याजवळचा काही भाग सूजला होता. यामुळे तिची चिडचिड देखील होत होती. सूज अधिक असल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रूग्णालयात दाखल केल्यानंतर चार दिवसांनंतर तिचा कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाला.
इसाबेलने पिअर्सिंग करण्यासाठी वापरलेलं सामानामुळे तिला संसर्ग झाला असल्याची माहिती आहे. तिच्या शरीराला तसंच त्वचेला हे पिअर्सिंग करण्याचं सामान सूट झालं नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.