डायबिटीज रुग्णांनी नारळ पाणी प्यावे की नाही? साखर वाढेल की कमी होईल, जाणून घ्या

Coconut Water : अनेकांचा मनात एक प्रश्न असतो की डायबिटीज (Diabetes) रुग्णांनी नारळ पाणी (Coconut Water) प्यावे की नाही?   डायबिटीज रुग्णांनी गोड पदार्थ खाणे टाळावे. कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. मात्र, असे असले तरी  नारळाच्या पाण्याची चव थोडी गोड असल्याने ते डायबिटीजमध्ये खाणे शक्य आहे की नाही हे माहित असणे आवश्यक आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: May 21, 2023, 08:31 AM IST
डायबिटीज रुग्णांनी नारळ पाणी प्यावे की नाही? साखर वाढेल की कमी होईल, जाणून घ्या title=

Coconut Water in Diabetes : सकाळी नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण नारळ पाणी आरोग्यासाठी चांगले असते. तर काही जण नारळाचे पाणी पिण्याचे  शौकीन असतात. विशेषत: जेव्हा लोक सुट्टीसाठी समुद्रकिनारी जातात तेव्हा नारळ पाण्याची चव वेगळीच अनुभूती देते. हे अतिशय आरोग्यदायी पेय मानले जाते, त्यात नैसर्गिक साखर असते, त्यामुळे अनेक वेळा डायबिटीजच्या रुग्णांना गोंधळ होतो की ते हे नैसर्गिक पेय पिऊ शकतात की नाही? नारळ पाण्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढेल की नाही ?  असा त्यांच्या मनात प्रश्न असतो. याबाबतचा संभ्रम आताच दूर करुन घ्या.

नारळ पाणी पिण्याचे फायदे

नारळ पाणी पिण्याचे फायदे अनेक आहेत. नारळ पाणी हे आरोग्यदायी आहाराचा एक भाग आहे, त्यात कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉलची पातळी फारशी वाढत नाही. उन्हाळ्यात ते अधिकाधिक पिण्याचा सल्ला दिला जातो कारण ते आपले संरक्षण करते. विशेषतः समुद्राच्या सभोवतालचे हवामान दमट असते, त्यामुळे अशा स्थितीत नारळ पाणी प्यायल्यास शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. यासोबतच यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.

जी व्यक्ती नियमितपणे नारळाचे पाणी पितो तो इलेक्ट्रोलाइट असंतुलनाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करतो. इलेक्ट्रोलाइट्स ही अशी खनिजे आहेत जी आपल्या शरीराची उर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात, असे अनेक संशोधन आणि अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे.

नारळ पाणी डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे का?

नारळ पाणी डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येतो. नारळाच्या पाण्याची चाचणी सौम्य गोड असते. कारण त्यात नैसर्गिक साखर आढळते, अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की हे पेय मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील आरोग्यदायी आहे का, की रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवेल?

ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या प्रख्यात आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी झी न्यूजला सांगितले की, नारळाचे पाणी पिणे साधारणपणे डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते. अनेक प्राण्यांवर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, याद्वारे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित केली जाऊ शकते. नारळाच्या पाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 55 पेक्षा कमी आहे, त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी ते हानिकारक नाही. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ते दररोज किती प्रमाणात प्यावे हे ठरवा आणि नारळ पाणी पिण्यास सुरुवात करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)