८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर...

जर तुम्ही ८ तासांची झोप घेत नसाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. एका शोधानुसार आठ तासांची झोप न घेणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचा धोका अधिक वाढतो.

Updated: Jan 8, 2018, 01:04 PM IST
८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर... title=

मुंबई : जर तुम्ही ८ तासांची झोप घेत नसाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. एका शोधानुसार आठ तासांची झोप न घेणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचा धोका अधिक वाढतो.

sleeping less than eight hours can cause depression

नियमितपणे झोप नीट न झाल्यास नकारात्मक विचारांचे प्रमाणही वाढते. संशोधनाच्या मते अपुऱ्या झोपेमुळे त्या व्यक्तीच्या आसपास नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढते. 

sleeping less than eight hours can cause depression

बिंघहॅम्टन युनिर्व्हसिटीचे प्रोफेसर मेरेडिथ कोल्स यांच्या माहितीनुसार, ज्यांची झोप पूर्ण होत नाही अशा व्यक्तींच्या आसपास नकारात्मक विचारांचा वेढा वाढू लागतो. यामुळे अशा व्यक्तींमध्ये तणावाचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठीच नव्हे तर तणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या.