Sleeping while sitting: तुम्हालाही लागते बसल्या बसल्या डुलकी? हे ठरू शकतं मृत्यूचं कारण?

बसून झोपणं ठरू शकतं जीवघेणं! बसल्या बसल्या झोपण्याचे जाणून घ्या फायदे आणि तोटे  

Updated: Oct 21, 2021, 09:59 PM IST
Sleeping while sitting: तुम्हालाही लागते बसल्या बसल्या डुलकी? हे ठरू शकतं मृत्यूचं कारण? title=

मुंबई: असं म्हणतात की झोपणं हे शरीरासाठी कायम फायदेशीर असतं. मात्र या झोपण्याची पद्धत आणि वेळा या फार महत्त्वाच्या असतात. शरीराला आरामाची गरज असते, मात्र ती देण्याची एक विशिष्ट पद्धतही असते. नाहीतर आपल्या चुकीच्या झोपण्याच्या सवयी आपल्या आरोग्यासाठीच हानिकारक ठरू शकतात. 

झोपणं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या थकलेल्या शरीराला आणि डोक्याला शांत करणं आणि थकवा दूर करण्यासाठी झोप महत्त्वाची असते. प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक पोटावर झोपतात, तर काही लोकांना कंबरेवर झोपतात. 

असेही काही लोक आहेत जे बसल्या बसल्या देखील झोपी जातात. जसे बसून झोपण्याचे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. बसून झोपणं आपल्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. काहीवेळा ते जीवावर बेतू शकतं आज बसून झोपण्याचे फायदे आणि तोटे याबाबत जाणून घेऊया.

बराच वेळ बसणे किंवा जास्त बसल्याने शरीराच्या अवयवांवर ताण पडतो. तुम्ही जेवढं जास्त बसून झोपणार तेवढं धोकादायक आहे. शरीरात त्यामुळे रक्ताच्या गुठळ्याही होण्याचा धोका असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. पायांच्या धमन्यांवर ताण येऊन त्या फुटण्याचा धोकाही असतो. तर हृदय आणि मेंदूमध्ये होणाऱ्या रक्तपुरवठ्यावरही याचा परिणाम होत असतो. त्यामुळे मृत्यू होण्याचा धोकाही असतो. 

तुम्हाला बसून झोपण्याची सवय असेल तर हे धोके आहेत आजच बदला ही सवय

-पाठीच्या मांसपेशींना त्रास होऊ शकतो. बऱ्याचदा वाकडे तिकडे बसून झोपल्याने स्नायूंवर जास्तीचा ताण पडतो. कंबरदुखी आणि पाठदुखीचा धोका होऊ शकतो. 
-बसून झोपल्याने गुडघ्यावर प्रेशर येतं. त्यामुळे गुडघेदुखी होऊ शकते. चालण्या-फिरण्याच्या समस्या उद्भवू शकतात. बऱ्याचदा पायात मुंग्या आल्यासारखं होऊ शकतं.
- रक्त प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. 

बसून झोपण्याचे फायदे

- जेव्हा झोपून श्वास घेण्यासाठी त्रास होतो तेव्हा बसून झोपल्याने आपल्याला श्वासोच्छवासाला त्रास होत नाही.
-गर्भवती महिलांना टेकून बसणे आणि तसंच झोपल्याने आराम मिळतो.
-एसिड रिफ्लक्सची समस्या असेल तर टेकून किंवा बसून झोपणं फायद्याचं असतं. 

सूचना- ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही. कोणतीही गोष्ट करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.