चार दिवसांचं नवजात बालक ठरलं सर्वात कमी वयाचं अवयवदाता; वाचवला चौघांचा जीव

Youngest Organ Donor : अवघ्या चार दिवसांच्या (4 Years Old Boy)बाळाने सहा जणांना (6 People Organ Donation) जीवनदान दिलंय. हे नवजात बाळ भारतातील सर्वात तरुण अवयवदाता ठरला आहे. (4 Days New Born Baby become young Donar in Surat) पालकांनी आपल्या मनावर दगड ठेवत हा निर्णय घेतला. या पालकांच देखील सगळीकडे कौतुक होत आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 20, 2023, 10:31 AM IST
चार दिवसांचं नवजात बालक ठरलं सर्वात कमी वयाचं अवयवदाता; वाचवला चौघांचा जीव title=

गुजरातमधील सुरतमध्ये एका 4 दिवसांच्या नवजात बालकाने 6 मुलांना नवे जीवन दिले आहे. या नवजात बालकाचे अवयव या मुलांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले आहेत. या नवजात बालकाचा जन्म झाला तेव्हा तो जन्मापासूनच ब्रेन डेड होता, असे सांगण्यात आले आहे. यानंतर त्याच्या पालकांनी नवजात बालकाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

गुजरातमधील सुरतमधून ही माहिती समोर आहे. ज्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. वस्त्रोद्योगात देशात आणि जगात नाव गाजवणारे सुरत आता अवयवदानातही आघाडीवर आहे. वास्तविक, सुरत शहरात अवघ्या 4 दिवसांच्या नवजात अर्भकाचे अवयव दान करण्यात आले आहेत. हे नवजात जन्मानंतर बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाच्या या निर्णयामुळे 6 मुलांना नवजीवन मिळाले. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.

नवजात जन्मापासूनच होते ब्रेनडेड 

सौराष्ट्र, गुजरातमधील अमरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या हर्ष आणि चेतना संघानी यांना १३ ऑक्टोबर रोजी मुलगा झाला. जन्मानंतर नवजात बेशुद्ध होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते, मात्र चार दिवस उलटूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तपासणीअंती बुधवारी डॉक्टरांच्या पथकाने बालकाचा मेंदू मृत घोषित केला. यानंतर डॉक्टरांनी अवयवदानाबद्दल कुटुंबियांना सांगितल्यावर कुटुंबीयांनी होकार दिला.

6 मुलांना नवजीवन मिळाले

मुलाच्या कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर अवयवदानाची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. यानंतर 4 दिवसांच्या नवजात अर्भकाचे दोन्ही मूत्रपिंड, यकृत आणि प्लीहा दान करण्यात आले. मुलाचे दोन्ही डोळे सुरतच्या लोक दृष्टी नेत्रपेढीला दान करण्यात आले. नवजात अवयवांचे प्रत्यारोपण फक्त लहान मुलांमध्येच होते. नवजात अवयव दानातून एकूण 6 बालकांना नवजीवन मिळाले आहे. १११ तासांत या नवजात बाळानं इतर सहा बालकांना नव जीवन दिलं आहे. दोन किडनी, लिव्हर आणि डोळे दान करण्याचा सर्वात धाडसी निर्णय त्याच्या पालकांनी घेतला. 

बाळाला नेमकं काय झालं?

१३ ऑक्टोबर रोजी हर्ष आणि चेlve संघानी या दाम्पत्याला बाळ झालं. पण जन्मापासूनच हे बाळ इतर नवजात बाळांप्रमाणं नव्हतं. बाळाची कसलीच हालचाल होत नव्हती तसेच ते रडतही नव्हतं. यानंतर या बाळाच्या अनेक तपासण्या करण्याl आल्या. त्याला व्हेंटिलेटरवर ठेऊन विशेष वैद्यकीय ट्रिटमेंट दिली गेली. कारण ते बरं होऊ शकेल. पण बाळाच्या मेंदूच्या काही चाचण्या केल्यानंतर हे स्पष्ट झालं की, बाळ ब्रेनडेड झालं आहे. पण केवळ पाच दिवस जगू शकलेल्या आपल्या बाळामुळं इतर सहा बाळांना नवजीवन मिळू शकतं हे कळाल्यानंतर त्यांनी बाळाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.