मुंबई : आजकाल केस पांढरे होण्यासाठी वयाची मर्यादा राहिलेली नाही. प्रदूषण, बदललेली जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि वेळा यामुळे केस वेळेआधीच पांढरे होतात. पण सफेद केस लपवण्यासाठी लोक अनेक केमिकल्स आणि ट्रीटमेंटची मदत घेतात. पण पैसे खर्च न करता सफेद केस काळे करण्याचा हा सोपा उपाय माहित आहे का? मग जाणून घ्या...
केस काळे करण्यासाठी एका गोष्टीची गरज असते आणि ती आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होते. आपल्या सर्वांच्या घरात चहापावडर असतेच. यात टॅनिक अॅसिड असते त्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. यासाठी ६ चमचे चहापावडर ३० मिनिटे पाण्यात उकळवा. त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि थंड झाल्यावर केसांना लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात कॉफीही मिसळू शकता.
केस काळे करण्याबरोबरच चहापावडरच्या पाण्याचे इतर अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया...