खरंच 'रोज खाओ अंडे'? अंड्यांच्या तोट्यांविषयी आजच घ्या जाणून

अतिप्रमाणात अंड्याचं सेवन केल्याने आरोग्यासंदर्भात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Updated: Jun 2, 2022, 03:09 PM IST
खरंच 'रोज खाओ अंडे'? अंड्यांच्या तोट्यांविषयी आजच घ्या जाणून title=

मुंबई : निरोगी राहण्यासाठी डाएट आणि रूटीनवर लक्ष देणं फार गरजेचं असतं. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, एक्सरसाईज, व्यायाम आणि वर्कआऊट केल्याने आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. आपल्यापैकी अनेकजण फीटनेससाठी त्यांच्या डाएटमध्ये अंड्याचा समावेश करतात. अंड्यामध्ये प्रोटीन असतं जे शरीरासाठी उपयुक्त असतं. मात्र तुम्हाला माहितीये का गरजेच्यापेक्षा जास्त अंड्याचं सेवन नुकसानदायक ठरू शकतं.

अतिप्रमाणात अंड्याचं सेवन केल्याने आरोग्यासंदर्भात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज जाणून घेऊया अतिप्रमाणात अंड्याच्या सेवनाने होणारं नुकसान.

हृदयासाठी धोकादायक

अतिप्रमाणात अंड्याचं सेवन केल्याने त्यामध्ये असणारं कोलेस्ट्रॉल हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं. एका अंड्याच्या सेवनामुळे शरीरात 180 किलो कोलेस्ट्रॉल पोहोचतं. याचा अर्थ तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. 

रक्तातील ब्लड शुगर

फार कमी लोकांना माहिती असेल की अंड्याच्या सेवनामुळे ब्लड शुगर अनियंत्रित होते. अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट भरपूर प्रमाणात असतं. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, फॅटच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन अस्थिर होतं. परिणामी मधुमेहाचा धोका उद्भवतो.

वजनात वाढ

अंड्यामध्ये असलेल्या फॅटमुळे तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. खरं तर अंड्याला वेट लॉससाठी एक उत्तम पर्याय मानला जातो. मात्र अतिप्रमाणात अंड्याचं सेवन फायद्यांऐवजी नुकसान पोहोवू शकतं.