घोरण्यामुळे आहेत त्रस्त? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...

अनेकांना आपण घोरतो म्हणून किंवा इतर लोकं घोरतात म्हणून रात्रीची झोपही येत नाही. 

Updated: Oct 14, 2022, 08:18 PM IST
घोरण्यामुळे आहेत त्रस्त? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर... title=

Tips to Stop Snoring: हल्ली आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक शारिरीक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यापैंकी घोरणं ही एक समस्या आहे. घोरणं हे आपल्या समाजात आजही सहज स्विकारलं जात नाही. कोणी व्यक्ती घोरत असेल तर त्या व्यक्तीच्या आजूबाजूला झोपायलाही आपण तयार होत नाही इतकं आपल्याला ते अपमानास्पद वाटतं. अनेकदा आपण घोरतो याची अनेकांना लाजही वाटते. (These are the useful tips to control snoring know more)

अनेकांना आपण घोरतो म्हणून किंवा इतर लोकं घोरतात म्हणून रात्रीची झोपही येत नाही. मग झोप न झाल्यामुळे अनेकांना त्याचा त्रास दिवसभर सहन करावा लागतो. आपल्या आपण घोरतोय हे समजतंही नाही. परंतु काळजी करू नका हे घरगुती उपाय तुमच्या घोरण्यावर कायमचा बंदोबस्त करतील. 

आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...

  • खरं म्हणजे नाक साफ असल्यास तुम्हाला घोरण्याच्या समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे तुमचं नाकं रोज साफ करा. रोज झोपायच्या आधी तुप गरम करून ते नाकात टाका. त्याचबरोबर तुम्ही ऑईल्व्ह ऑईलचेही दोन थेंब नाकात टाकलेत तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. 
  • लसणाचा वापर आपल्याला घोरण्याच्या समस्येपासून दूर ठेवतो. त्यामुळे रोज रात्री कोमट पाण्यासोबत दोन-तीन पाकळ्या लसणाच्या खा. 
  • लसणासोबतच पुदीनाही घोरण्यावर गुणकारी आहे. लसणाप्रमाणे पुदीन्याचे सेवनही कोमट पाण्यासोबत घ्यावे आणि या गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात.  
  • हळद ही आरोग्यासाठी औषधी असते. तेव्हा झोपायच्या आधी हळदीचे दूध प्या. त्याचसोबत तुम्ही हळद आणि मधाचेही सेवन करू शकता.  

आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का

घोरण्याची कारणे आणि परिणाम - 
घोरण्याचे शरीरावर अनेक नकारात्मक परिणामही होतात तेव्हा जाणून घेऊया घोरण्याची कारणे आणि परिणाम काय आहेत ते. मानसिक ताण, वाढलेले वजन, नाकासंबंधित आजार, व्यसन इत्यादी कारणांमुळे घोरण्याची समस्या वाढते. घोरण्यामुळे झोप कमी लागते तसेच हृदयविकार उद्बभू शकतात. घोरण्यामुळे राग, चीडचीड वाढते. श्वासात अडथळे निर्माण झाल्याने घोरण्याची समस्या वाढू शकते. घोरण्याचा रक्तदाबावरही परिणाम होऊ शकतो. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)