सिगारेटच्या एका झुरक्यानंतर काही मिनिटांत शरीरात होतात 'हे' बदल, तर 8 तासांनंतर...!

Cigarette Impact On Health : सिगारेटच्या पाकिटावर देखील याबाबतची वॉर्निंग लिहीण्यात येते, मात्र आरोग्याचे धोके माहिती असून देखील लोकं सिगारेट पितात. सिगारेट प्यायल्यानंतर तुमच्या शरीरात प्रत्येक वेळेला कसे बदल होतात, हे तुम्हाला माहितीये का?

सुरभि जगदीश | Updated: Jul 19, 2023, 09:03 PM IST
सिगारेटच्या एका झुरक्यानंतर काही मिनिटांत शरीरात होतात 'हे' बदल, तर 8 तासांनंतर...! title=

Cigarette Impact On Health : धुम्रपान करणं हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतं. याची आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. सिगारेटच्या पाकिटावर देखील याबाबतची वॉर्निंग लिहीण्यात येते, मात्र आरोग्याचे धोके माहिती असून देखील लोकं सिगारेट पितात. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, सिगारेट प्यायल्याने मन आणि डोकं शांत होण्यास मदत होते. 

मात्र तुम्हाला माहितीये का, सिगारेट प्यायल्यानंतर तुमच्या शरीरात प्रत्येक वेळेला कसे बदल होतात, हे तुम्हाला माहितीये का? धूम्रपानाचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. यामुळे फुफ्फुस, हृदय तसंच डोळ्यांच्या समस्या सहज होऊ शकतात.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मते, सिगारेटच्या धुरामुळे शरीरातील जवळपास अवयवांचं नुकसान होतं. सिगारेट ओढल्याने श्वसनसंस्था, रक्ताभिसरण, प्रजनन प्रणाली, त्वचा आणि डोळे यावर वाईट परिणाम होतो. सिगारेटच्या एका झुरक्याचा आरोग्यावर कसा वाईट परिणाम होतो चला जाणून घेऊया.

सिगारटेच्या एका झुरक्याने शरीरावर तातडीने दिसतात हे परिणाम

ज्यावेळी तुम्ही सिगारेटचा पहिला झुरका घेता, त्यावेळी नाकाचं अस्तर आणि इसोफोगस लाल होऊ लागतं. सिगारटेमध्ये असलेले केमिकल्स आणि धुरांमुळे त्यांना इरिटेशन होतं. परिणामी खोकला देखील सुरु होतो. यानंतर तुमचं तोंड कोरडं पडू लागतं आणि श्वासाला दुर्गंधी येते. काहीवेळानंतर तोंडाच्या मागील बाजूस काहीशी खाज येण्याची समस्या जाणवते. 

20 मिनिटांनंतर कसे बदल होतात. 

यावेळी निकोटीन तुमच्या ब्लड स्ट्रीममध्ये प्रवेश करतं. यावेळी तुमच्या नाडीचे ठोके आणि ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या दिसून येते. शरीरात हे बदल झाले की, व्यक्तीची वास घेण्याची क्षमता देखील कमी होते. 

8-48 तासांदरम्यान शरीरात होणारे बदल

सिगारेट प्यायल्यानंतर 8 ते 48 तासांच्या दरम्यान निकोटीन आणि कार्बन मोनोक्साईड तुमच्या शरीरात रिलीज होते. जर तुम्ही पुन्हा स्मोकिंग केलं नाही तर हे बदल दिसतील. फुफ्फुसांच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षित करण्यासाठी बनवलेला म्यूकस बाहेर पडू लागेल. हे निकोटीन तुमच्या शरीरातून 

सिगारेटमध्ये असलेले निकोटीन केवळ व्यसनच बनत नाही तर वास घेण्याची आणि चव घेण्याची क्षमता देखील कमकुवत करते. निकोटीन तुमच्या शरीरातून बाहेर पडण्यासाठी सुमारे दोन दिवस लागतात. अनेकदा काही लोकांना ऐकू कमी येण्याच्या समस्येला देखील सामोरं जावं लागतं.