शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यावर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच लक्ष द्या!

Blood Clots Symptoms: चिंता आणि नैराश्य आणि डीप वेन थ्रोम्बोसिस धोका यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी 1.1 लाखांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आलं. यामध्ये एकूण 1,520 लोकांचे ब्रेन इमेजिंग करण्यात आलं.

सुरभि जगदीश | Updated: Jul 31, 2024, 03:28 PM IST
शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यावर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच लक्ष द्या! title=

Blood Clots Symptoms: चिंता किंवा डिप्रेशन यांच्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देतात. असंच नुकत्याच झालेल्या एका संधोधनामध्ये असं दिसून आलं आहे की, सततची चिंता आणि डिप्रेशनमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असतो. यावेळी हा धोका 50 टक्क्यांनी बळावण्याचा धोका अधिक असतो. मेंदूच्या इमेजिंगमध्ये असं दिसून आलंय की, तणावामुळे मानसिक आजारामुळे जळजळ आणि डीप व्हेन थ्रोम्बोसिसचा धोका वाढतो. नसांमध्ये रक्ताची गुठळी तयार होऊ लागते.

चिंता आणि नैराश्य आणि डीप वेन थ्रोम्बोसिस धोका यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी 1.1 लाखांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आलं. यामध्ये एकूण 1,520 लोकांचे ब्रेन इमेजिंग करण्यात आलं. त्यापैकी तीन वर्षांत 1781 लोकांमध्ये (१.५ टक्के) रक्ताच्या गुठळ्या होण्याची स्थिती आढळून आली. 

संशोधकांना असं आढळून आलं की, चिंता किंवा नैराश्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका सुमारे 50 टक्क्यांनी वाढतो. चिंता आणि नैराश्य या दोन्हींचा त्रास होत असल्यास, रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता 70 टक्के असते. त्याचप्रमाणे चिंता आणि डिप्रेशन यामुळे डीप वेन थ्रोम्बोसिसचा धोका अधिक वाढतो.

रक्ताच्या गुठळ्या होणं म्हणजे नेमकं काय?

रक्ताची गुठळी हा रक्ताचा एक गठ्ठा असतो जो जेव्हा तुमच्या रक्तातील प्लेटलेट्स आणि प्रोटीन मिळून चिकटून तयार होतो. प्लेटलेट्स हे पेशींचे तुकडे असतात जे साधारणपणे तुमच्या रक्ताच्या गुठळ्या होण्यास मदत करतात. रक्ताच्या गुठळ्या दुखापतीतून रक्तस्त्राव कमी करण्यास मदत करतात. तुम्हाला झालेली दुखापत बरी झाली की ते तुटतात आणि विरघळतात.

रक्ताच्या गुठळ्या होण्याची कारणं

  • छातीत तीव्र वेदना
  • सामान्य खोकला किंवा खोकल्यातून रक्त येणं
  • वारंवार पाय किंवा पाठदुखी
  • चक्कर येणं
  • जास्त घाम येणं
  • हात आणि पायांना सूज आणि वेदना
  • त्वचेवर पुरळ उठणे
  • शरीरावर सूज येणं.
  • अचानक श्वास घेण्यात अडचण