Remove black spots: चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी स्वयंपाकघरातील या गोष्टी करतील मदत

काही घरगुती उपायांनी तुम्ही चेहऱ्यावरचे डाग काढू शकता.

Updated: Jun 13, 2021, 07:01 PM IST
Remove black spots: चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी स्वयंपाकघरातील या गोष्टी करतील मदत

मुंबई : चेहऱ्यावर येणाऱे डाग प्रत्येकाला नकोसे असतात. हे डाग निघून जावेत यासाठी अनेकजण ना-ना प्रकारचे प्रयत्न करतात. यामध्ये स्किन-केयर क्रीम, फेस-वॉश तसंच लोशनचा वापर केला जातो. मात्र चेहऱ्यावरून हे डाग काढणं फारच अवघड होऊन बसतं. जर तुम्हीही चेहर्‍यावरील डागांमुळे त्रस्त असाल तर ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण काही घरगुती उपायांनी तुम्ही चेहऱ्यावरचे डाग काढू शकता.

टोमॅटोचा वापर

व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेला टोमॅटो देखील आपल्या त्वचेसाठी फार उपयुक्त ठरतो. डाग काढून टाकण्यासाठी टोमॅटो प्युरी बनवा. नंतर ते आपल्या त्वचेवर 15 मिनिटांसाठी मालिश करा आणि थंड पाण्याने धुवा. महिन्यातून दोनदा हे करू शकता.

बटाट्याचा वापर

चेहऱ्यावरील गडद डागांना कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. यासाठी बटाटा कापून त्याला चेहऱ्यावरील डागांवर लावा. बटाट्यासोबत मध मिक्स करून त्याचा फेसमास्क म्हणूनही वापर करता येतो.

लिंबूचा वापर

व्हिटॅमिन सी युक्त असलेलं लिंबू त्वचेवरील गडद डाग कमी करण्यास मदत करू शकतं. यासाठी डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस काही वेळा लावावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. डाग काढून टाकण्यासाठी आठवड्यातून 3 ते 4 वेळा याचा वापर करु शकता.

ताकाचा वापर

ताक देखील चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करतं. यासाठी आपल्याला 4 चमचे ताक आणि 2 चमचे टोमॅटोचा रस मिसळून पेस्ट बनवावी लागेल. ही पेस्ट 15 मिनिटांसाठी चेहर्‍यावर लावा आणि पाण्याने धुवा. आठवड्यातून तीन ते चार वेळा हे करा.