बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी 'हे' आयुर्वेदिक उपाय करतील मदत

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा बद्‍धकोष्ठताची समस्या निर्माण होते.

Updated: Jun 15, 2021, 02:10 PM IST
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी 'हे' आयुर्वेदिक उपाय करतील मदत title=

मुंबई : आपलं पोट नेहमी साफ आणि चांगले असणे खूप महत्वाचे आहे. पोट हा शरीराचा महत्वाचा घटक आहे. आपलं पोट साफ नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा बद्‍धकोष्ठताची समस्या निर्माण होते. या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांचं पोट साफ होत नाही. यामुळे चिडचिडेपणा, राग तसंच व्यक्ती आळशी होतो. एका अभ्यासानुसार भारतातील किमान 22 टक्के प्रौढ या आजाराने त्रस्त आहेत. 

आयुर्वेदात जवळजवळ सर्व रोगांवर उपचार एक नैसर्गिक प्रक्रियेद्वारे सांगितले आहेत. यामध्ये पारंपारिक औषधांच्या वापरावर जोर देण्यात येतो. आयुर्वेदानुसार, चुकीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची तक्रार उद्भवू शकते. ज्या लोकांना बद्धकोष्ठता त्रास आहे त्यांनी दररोज योग्य आहार घेतला पाहिजे. तसंच बर्‍याच वेळा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बद्धकोष्ठतेने ग्रस्त रूग्णांसाठी कोणते आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरतील हे जाणून घेऊया -

त्रिफळं

या आयुर्वेदिक औषधाचा उपयोग करून अनेक आरोग्यविषयक समस्यांवर मात करता येते. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यात प्रभावी असल्याचं सिद्ध आहे. तसेच यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. दाव्यानुसार, साधारण 2 आठवड्यांपर्यंत याच्या नियमित वापरामुळे रुग्णांना आराम मिळेल. एक कप गरम पाण्यात एक चमचा त्रिफळं 10 मिनिटं ठेवा. त्यानंतर फिल्टर करून हे पाणी प्यावं.

बडीशेप

बडीशेपमध्ये एंटी-इंफ्लेमेट्री घटक असतात. जे पोट संबंधित समस्या दूर करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त, यामध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या रुग्णांना आराम मिळेल. आरोग्य तज्ञांच्या मते, बद्धकोष्ठता आणि इतर पोटात संबंधित समस्या जसं की गॅस आणि ओटीपोटात सूज येणं अशा तक्रारी असणाऱ्यांना बडीशेपचा चहा फायदेशीर ठरतो.

अंजीर

या फळामध्ये सॉल्यूबल फायबर असतं. जे शौचाची प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करते. यासह, त्याचं सेवन पोट साफ करतं. अंजीर रात्रभर पाण्याच भिजवून ठेवल्यावर सकाळी त्यांचं सेवन करा. असं केल्यास बद्धकोष्ठतेने ग्रस्त रूग्णांना दिलासा मिळेल.

बेल

तज्ज्ञांच्या मते, बेल पोटाला थंड ठेवतं आणि त्यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यासाठी मदत करतात. तुम्हाला हवं असल्यास बेलच्या प्लपचंही सेवन करू शकता. याचं तुम्ही सरबतही करू शकता.