एकतर्फी प्रेमात या '5' चूकांमुळे आयुष्यभर होईल पश्चाताप

  प्रत्येकाला आयुष्यात प्रेम मिळतच असे नाही. 

Updated: Jul 25, 2018, 04:28 PM IST
एकतर्फी प्रेमात या '5' चूकांमुळे आयुष्यभर होईल पश्चाताप  title=

मुंबई :  प्रत्येकाला आयुष्यात प्रेम मिळतच असे नाही. काही जण त्यांना आवडणार्‍या व्यक्तीकडे प्रेमाची कबुली देऊ शकत नाहीत तर काहींच्या रिलेशनशीपमध्ये भावनिक, धार्मिक, आर्थिक अडथळे येतात. अशावेळेस अनेकदा एकतर्फी प्रेमातच समाधान मानावं लागतं. परंतू भावनांमध्ये तुम्ही वाहवत गेल्यास त्याचा त्रास होण्याचा धोका असतो. परिणामी मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असते. 

एकतर्फी प्रेमामध्ये काय टाळाल ? 

नैराश्यापासून दूर रहा 

प्रत्येक रिलेशनशीपचा शेवट सुखद किंवा तुमच्या मनाजोगा होईलच असे नाही.  त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या अभ्यास, करियरवर होणार नाही याची काळजी घ्या. नैराश्याच्या जाळ्यात अडकू नका. 

विसरण्याचा प्रयत्न करा 

तुमचं नातं यशस्वी झालं नाही म्हणून त्यामध्येच गुरफटून जाऊ नका. शक्य तितक्या लवकर यामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा. हळूहळू त्या व्यक्तीला विसरण्याचा, त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा. जबरदस्ती प्रेम थोपवल्याने कोणाचाच फायदा होणार नाही हे ओळखा. ब्रेकअप झाल्यानंतर मित्र/मैत्रिणींना चुकूनही या '५' गोष्टी बोलू नका!

चूकीचं पाऊल टाकू नका 

कोणाच्याही दाबावाखाली येऊन चूकीचं पाऊल टाकू नका. यामधून तुम्हांला काहीच मिळणार नाही. एका चूकीच्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणून वेळीच त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.  त्रास सहन करूनही मुली या '6' कारणांसाठी नातं जपतात !

हिंसा टाळा 

तुमचं नातं यशस्वी ठरलं नाही या रागातून कोणताही टोकाचा निर्णय, समोरच्या व्यक्तीबाबत नकारात्मक भावना मनात ठेवू नका. प्रेम दिल्याने ते अधिक वाढते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे नुकसान करून तुम्ही आनंदामध्ये राहू शकत नाही.  'क्रश'ला समोर पाहून मुलींकडून हमखास होतात 'या' चूका

गोष्टी लवकर विसरा 

केवळ तुम्हांला तुमचं प्रेम मिळालं नाही म्हणून तुम्हीदेखील दुसर्‍यांसोबत तसेच वागणं योग्य ठरणार नाही. भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. समोरची व्यक्ती तुमची काळजी, प्रेम करत असेल तर किमान त्याचा आदर करा.  'या' वयातील महिला अधिक रोमॅन्टिक !

नशेच्या आहारी जाऊ नका 

तुमच्या आयुष्यात कोणतीच फिल्मी स्टाईल वापरू नका. वास्तवात जगण्याचा प्रयत्न करा. दु:ख़ातून सावरण्याचा प्रयत्न करा. त्याचा बाऊ करून बाहेर पडण्यासाठी नशेच्या आहारी जाऊ नका.