वर्किंग वूमन्सला फिट ठेवतील या ८ सोप्या टिप्स!

वर्किंग वुमन्सला घर, ऑफिस दोन्ही सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते.

Updated: Apr 25, 2018, 05:10 PM IST
वर्किंग वूमन्सला फिट ठेवतील या ८ सोप्या टिप्स! title=

मुंबई : वर्किंग वुमन्सला घर, ऑफिस दोन्ही सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र या सर्व धावपळीत त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पण तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यांसोबत स्वतःला फिट ठेवणे ही देखील तुमची जबाबदारी आहे, हे विसरु नका. दिवसाभराच्या धावपळीतून स्वतःला फिट ठेवण्यासाठी या काही खास टिप्स...

लवकर उठा

वर्किंग वुमन्सला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण त्यांना लवकर उठण्याशिवाय पर्याय नसतो. पण लवकर उठण्याचे खूप सारे फायदे असल्याने लवकर उठा. थोडा वेळ लवकर उठल्याने तुम्हाला वृत्तपत्र वाचण्यास, शांत बसून चहा पिण्यास निवांत वेळ मिळेल.

पोट साफ असणे गरजेचे

अनेक समस्या पोटापासून सुरू होतात. पोट साफ न झाल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे रोज पोट साफ होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इतर गोष्टींची काळजी घेताना दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. दिवसातून दोनदा न चुकता दात घासा.

 

व्यायाम

कामात कितीही व्यस्त असाल तरी व्यायामासाठी थोडासा वेळ काढा. व्यायाम करणे हा तुमच्या दिनचर्येचा एक भाग होऊ द्या. त्यासाठी जिमला जा किंवा वॉक घ्या. अथवा योग, झुम्बा असे अनेक पर्याय तुमच्याकडे आहेत.

बसण्याची स्थिती योग्य ठेवा

नीट, ताठ बसल्याने पाठकणा योग्य स्थितीत राहतो आणि पर्सनालिटीही उत्तम दिसते. खांदे झुकवून चालल्यास कमजोर आणि कमी आत्मविश्वास असल्याचे जाणवते. त्यामुळे ऑफिसमध्ये बसताना, गाडी चालवताना तुमची पोश्चर सुस्थितीत ठेवा. 

आराम करा

आरोग्यासाठी आरामही महत्त्वाचा आहे. दररोज १० मिनिटे ध्यान करा. पुस्तक वाचा, गाणी ऐका. तुमचा छंद जोपासा. त्यातून तुम्हाला आनंद आणि ऊर्जा मिळेल.

योग्य आहार घ्या

अन्नाचा आपल्या शरीर-मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे सात्विक, संतुलित आहार घ्या. प्रोटीन्स, फायबर्स, विटॉमिन्स आणि मिनरल्स याचा आहारात समावेश करा. 

सहकार्यांसोबत मज्जा मस्ती करा

आपण दररोज ८-९ तास ऑफिसमध्ये असतो. त्यामुळे ऑफिसमध्येही सहकार्यांसोबत एक कुटुंब तयार होते. त्यामुळे सहकार्यांशी चांगले नाते ठेवा. त्यांच्या सोबत मज्जा मस्ती केल्याने ताण दूर होण्यास मदत होईल.

पुरेशी झोप घ्या

आपल्याला ७-८ तासांची हरज असते. अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी स्मार्टफोन, टी.व्ही. पासून दूर रहा आणि निवांत झोप घ्या.