मुंबई : रंगबेरंगी सण होळी येताच सगळीकडे रंगाची उधळण होऊ लागते. रंगात खेळण्याचा मोह आवरता येत नाही. मग त्यापासून त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील.
१. त्वचेवर पेट्रोलियम जेल लावा. त्यामुळे रंग त्वचेच्या आत शिरकाव करणार नाहीत. त्याचबरोबर डार्क रंगासोबत होळी खेळणे टाळा. कारण त्यात केमिकल्स असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेला खाज येणे, जळजळ अशा समस्या उद्भवू शकतात.
२. होळी खेळण्यापूर्वी त्वचेला, चेहऱ्याला सन्सक्रिम लोशन अवश्य लावा. सन्सक्रिम जेल बेस्ड, वॉटरप्रुफ आणि एसपीएफ २५ असावे. बाहेर जाण्यापूर्वी २० मिनिटे आधी सन्सक्रिम लावा. ३ तासांनंतर त्याचा पुन्हा वापर करा.
३. एखाजी जखम किंवा कापले गेले असल्यास त्यावर बॅंडएड लावा आणि मगच होळी खेळ्यासाठी बाहेर पडा. कारण रंगातील हानिकारक केमिकल्स जखमेत जाऊन समस्या अधिक वाढू शकते.
४. होळी खेळून आल्यावर स्वच्छ अंघोळ करा. मात्र रंग काढताना अंग जोरजोरात घासू नका.
५. अंघोळीसाठी लिक्विड सोपचा वापर करा. रंग जात नसल्यास त्यावर घरगुती उपाय करा. उदा. लिंबाचा रस, दही, चंदन पावडर याचा वापर करा. तसंच पिठात हळद घालून त्याचे मिश्रणही तुम्ही वापरु शकता.