पिवळ्या दातांमुळे दिलखुलास हसण्याची लाज वाटतेय? दात स्वच्छ ठेवण्यासाठी वाचा या गुणाकारी टीप्स

दातांच्या पिवळेपणामुळे मोकळेपणाने हसता येत नाही. या लेखाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 

Updated: Apr 15, 2021, 07:40 AM IST
पिवळ्या दातांमुळे दिलखुलास हसण्याची लाज वाटतेय? दात स्वच्छ ठेवण्यासाठी वाचा या गुणाकारी टीप्स title=

 रोज सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी आपण ब्रश करतो. दातांना स्वच्छ ठेवण्यासाठी लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्ट वापरतात. तरीही लोकांना दातांच्या समस्या असतात. चांगल्या पद्धतीने ब्रश करून देखील अनेकांच्या दातांमधील पिवळेपण आण कैविटी दूर होत नाही.  अशा समस्यांमुळे मोकळेपणाने हसता पण येत नाही. या लेखाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 

 
1. बेकिंग सोडा

दातांच्या स्वच्छतेसाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरू शकतो. यामुळे दातांमधील नको असलेले जंतू मारले जातात. बेंकिंग सोड्याच्या वापरामुळे दातांचा वासही येत नाही.

असा करा वापर 
 बेकिंग सोडा, पाणी आणि थोडेसे मिठ यांचे मिश्रण तयार करा. त्यानंतर ते दातांवर हळूवार लावा. टूथब्रश चारही बाजूंनी हळुवार फिरवा. ब्रश हिरड्यांवरून हळूवार फिरवा अन्यथा हिरड्यांना इजा होण्याची शक्यता असते.
 

 2. लवंग

 भारतीय स्वयंपाक घरात लवंग ही सहज आढळणारी गोष्ट आहे. अनेक लोक दातात लवंग घालून बराच वेळ चघळत असतात. यामुळे दातातील अस्वच्छ घटक आणि वास दूर व्हायला मदत होते.

असा करा वापर 
 लवंगाच्या तेलाने ब्रश केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. किंवा लवंग दळून त्यांची पावडर बनवावी. लवंगच्या पावडरमध्ये थोडे पाणी, दोन थेंब लिंबूचा रस मिळवा. तयार झालेल्या मिश्रणाचा ब्रश करा. 15 दिवसात निरोगी आणि स्वच्छ दात होतील 

 3.  विनेगार

 विनेगारचा वापर दातांसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यातील ऍसेडिक तत्व दातांना स्वच्छ बनवतात. 
 

असा करा वापर
 एक चमचा एप्पल साइडर विनेगारमध्ये दोन चमचे पाणी घालून मिश्रण करा. टूथब्रशला या मिश्रणात बुडवा आणि त्यानंतर ब्रश करा
 

 4. केळीचे साल

 दातांना स्वच्छ आणि पांढरेशुभ्र ठेवण्यासाठी केळीच्या सालीचा उपयोग होऊ शकतो. त्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो.
 

असा करा वापर
 केळीच्या सालाचा पांढरा भाग दररोज 2-3 मिनिटं दातांवर घासा. त्यानंतर ब्रश करा.  आठवड्यातून 2-3 वेळा असे केल्याने दातांतील पिवळेपण नष्ट कमी होईल.
 

 5. मोहरीचे तेल आणि मिठ

 दातांची निगा राखण्यासाठी मोहरीचा वापर प्रभावी ठरतो. आयुर्वेदातदेखील दातांच्या स्वच्छतेसाठी आणि मजबूतीसाठी मोहरी गुणकारी असल्याचे म्हटले आहे. 
 

असा करा वापर
 अर्धा चमचा मोहरीच्या तेलात चिमूटभर मिठ मिसळा. त्याचे उत्तम मिश्रण तयार करा. त्यानंतर बोटाने दात आणि हिरड्यांवर मसाज करा. हवं तर टूथब्रश वापरा. 

--------------------------------

(वरील लेख समान्य माहितीच्या आधारावर आहे. कोणत्याही सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा )