स्टॅमिना वाढवण्यासाठी मदत करतील हे उपाय

घरगुती उपायांनाही स्टॅमिना वाढवण्यास मदत होऊ शकते.

Updated: Nov 16, 2019, 03:22 PM IST
स्टॅमिना वाढवण्यासाठी मदत करतील हे उपाय
संग्रहित फोटो

मुंबई : काही लोकांना थोडं जरी काम केलं की लगेच थकवा जाणवतो. यामागे अनेक कारणं असू शकतात. पण असं रोज होत असल्यास तुमचा स्टॅमिना कमी असल्याची शक्यता आहे. स्टॅमिना कमी असण्याचा परिणाम आपल्या शरीरासह आपल्या मेंदूवरही होत असतो. स्टॅमिना एक अशी ताकद आहे, ज्यामुळे आपण दिवसभर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक काळ काम करु शकतो. काही घरगुती उपायांनाही स्टॅमिना वाढवण्यास मदत होऊ शकते.

नाश्ता आवश्यक - 

दिवसाची सुरुवात स्वस्थरित्या करा. नाश्ता दिवसातील सर्वात प्रमुख जेवण आहे. यामुळे शरीरातील मेटाबोलिज्म वाढतं. यामुळे शरीरातील कॅलरी वाढेल आणि एनर्जी आणि स्टॅमिनाही वाढण्यास मदत होईल.

झोप - 

प्रत्येक व्यक्तीला सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. त्यामुळे मेंदूचा आणि शरीराचा परफॉर्मेन्स चांगला राहतो. चांगली झोप येत नसेल तर योगा करु शकता. यामुळे चिंता, मानसिक थकवा कमी होण्यास मदत होते. रात्री लवकर जेवा, यामुळे जेवण पचून झोप चांगली येण्यास फायदा होऊ शकतो.

व्यायाम - 

व्यायाम, व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक स्टॅमिना वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. व्यायामाने दिवसभर उर्जा राहण्यास, स्टॅमिना वाढवण्यास मदत होते. चालणं, स्विमिंग, एरोबिक्सने फायदा होऊ शकतो. योगा, ध्यान-धारणाने ताण-तणाव दूर राहण्यास मदत होते. 

संगीत - 

संगीत व्यक्तीचा मूड सुधारण्यासाठी फायदेशीर असल्याचं संशोधनातून सांगण्यात आलं आहे. जे लोक व्यायामादरम्यान संगीत ऐकतात त्यांचा हार्टरेट, त्या लोकांपेक्षा कमी असतो जे असं करत नाहीत. यामुळे स्टॅमिना वाढवण्यास मदत होऊ शकते.

धुम्रपान करु नये -

धुम्रपानामुळे शरीराच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर परिणाम होत असतो. स्टॅमिना वाढवण्यासाठी धुम्रपान सोडणं आवश्यक आहे. 

संतुलित आहार - 

स्टॅमिना आपल्या आहारावरही अवलंबून असतो. आहारावर अधिक लक्ष द्या. जेवणामुळे शरीराला चांगली उर्जा मिळते. दिवसांतून चार ते पाचवेळा थोड्या वेळाने खाणं फायद्याचं ठरतं. आहारात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा. आहारात नारळाच्या तेलाचा उपयोग गुणकारी ठरतो. हे तेल पचायला हलकं असून स्टॅमिना वाढवण्यासही मदत होते.

  

अश्वगंधा -

अश्वगंधा स्टॅमिना वाढवण्यासाठी उत्तम उपाय आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने याचं प्रमाण ठरवून घेता येऊ शकतं.

केळी, अंडी - 

केळ्यात असलेले कार्बोहायड्रेट्स फायद्याचे ठरतात. यामुळे एनर्जी वाढवण्यास मदत होते. अंडी प्रोटिन आणि कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळेही स्टॅमिना वाढवण्यास मदत होऊ शकते.