चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये शर्ट अडकून कर्मचारी आत ओढला गेला आणि... ; वरळीतील धक्कादायक प्रकार

Mumbai News : चायनीज पकोड्याच्या स्टॉवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्य़ाचा दुर्दैवी अंत. घडलेली घटना इतकी भयंकर होती की...     

Updated: Dec 17, 2024, 08:26 AM IST
चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये शर्ट अडकून कर्मचारी आत ओढला गेला आणि... ; वरळीतील धक्कादायक प्रकार title=
Mumbai news Worker dies after grinder pulls him in at food stall

Mumbai News : मुंबईतील रस्त्यांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अनेकदा सुरक्षिततेच्या निकषांचं पालन केलं जात नाही. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. 

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : (Mumbai News)  मूळच्या झारखंडच्या असणाऱ्या 19 वर्षीय करुणाचा मुंबईतील वरळी इथं शनिवारी धक्कादायक मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर अनेकांनाच धक्का बसला. मृतकाची ओळख सूरज नारायण यादव असून, घटनास्थळी तो साधारण तीन ते चार महिन्यांपासून कामावर रुजू झाला होता. 

वरळीतील सचिन कोठेकर (32) यांच्या मालकीच्या चायनीज स्टॉलवर हा 19 वर्षी युवक काम करत होता. प्राथमिक माहितीनुसार चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये शर्ट अडकल्याने हा कर्मचारी आत ओढला गेला. ज्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने कर्मचाऱ्याला बाहेर काढण्यात आलं. वरळी येथील नरिमन भाट नगर इथं ही घटना घडली असून, यामध्ये 19 वर्षीय सूरज यादवचा मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

पोलिसांनी सांगितलं घटनास्थळी नेमकं काय घडलं... 

'ही घटना तेव्हा घडली ज्यावेळी तो युवक चायनीज पदार्थ बनवण्यासाठी तिथं काम करत होता. यापूर्वी त्याचा या कामाचा कोणताही अनुभव नसून, यंत्र हाताळण्याची माहितीसुद्धा नव्हती. पण, कोठेकर यांनी कथित स्वरुपात सुरक्षिततेसंदर्भातील निकषांचं पालन आणि प्रशिक्षण नसतानाही त्याला या यंत्रावर काम करण्यास सांगितलं', असं वृत्त पोलिसांनी दिलेल्या माहितीतून मिळालं. 

हेसुद्धा वाचा : Shocking News : परदेशातील रेस्तराँमध्ये एकाच वेळी एकाच खोलीत 12 भारतीयांचा मृत्यू; खरं कारण खळबळजनक...

सदर घटनेनंतर दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरील घटना CCTV कैद झाल्याचंही म्हटलं गेलं.