Tongue Color Symptoms : लिव्हर हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात यकृत मदत करू शकते. याशिवाय ते आपल्या शरीरात चरबी शोषून घेण्यासाठी पित्त तयार करते. इतकंच नाही तर लिव्हरच्या मदतीने शरीरात ऊर्जेसाठी साखरही साठवली जाते. अशा परिस्थितीत यकृताशी संबंधित समस्या उद्भवू लागल्यास अनेक प्रकारच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. यकृताच्या समस्यांमागे अनेक कारणे असू शकतात. ज्यात खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतील समस्यांचा समावेश होतो. यकृताच्या समस्येच्या बाबतीत, शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसतात, त्यापैकी काही जिभेवर देखील दिसतात. या लक्षणावरून तुम्ही ओळखू शकता की, तुमचं लिव्हर डॅमेज होतंय.
NCBI च्या रिपोर्टनुसार, यकृताच्या समस्येच्या बाबतीत, शरीरात अनेक लक्षणे दिसतात. ज्यामध्ये भूक न लागणे, पोटाच्या वरच्या भागात दुखणे, खाल्ल्यानंतर अपचन झाल्यासारखे वाटणे. त्याच वेळी, जीभेवर काही लक्षणे देखील दिसू लागतात ती समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. लिव्हरचा त्रास होत असेल तर पाणी पिणे देखील त्रासदायक होते.
लिव्हरची समस्या असल्यास, जिभेचा रंग अगदी पिवळा दिसतो. हे प्रामुख्याने कावीळ, फॅटी लिव्हर यांसारख्या स्थितींमध्ये दिसून येते. जर तुम्हाला अशा प्रकारची समस्या जाणवत असेल तर परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. अनेकदा दातांचा पिवळेपणा आणि जिभेचा पिवळेपणा तोंडाच्या दुर्गंधीला कारणीभूत असतो.
लिव्हरची समस्या असेल तर किंवा फॅटी लिव्हरचा त्रास असेल तर जिभेवर पांढऱ्या रंगाचा थर जमा होतो. या स्थितीमुळे खूप अस्वस्थ वाटू शकते. अनेकदा जेवल्यानंतर तोंड किंवा जीभ स्वच्छ न केल्यासही पांढरा थर जमा होतो.
जीभेवर कोणतंही कारण नसताना छोटे छोटे दाणे येणे हे लिव्हरशी संबंधित आजारांची लक्षणे आहेत. शरीरातील घाण स्वच्छ होत नसल्याचे हे लक्षण आहे. अनेकदा शरीरात उष्णता निर्माण झाल्यावरही जीभेवर दाणे येतात. यकृत खराब झाल्यावर जीभेवर हे लक्षण दिसते.
लिव्हरशी संबंधीत जुने आजार जीभ कोरडी करून टाकतात. काही गंभीर स्थितीमध्ये जीभेवर चीर देखील पडते. यामुळे जेवताना त्रास होतो. लिव्हर हे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. त्यामुळे जीभेची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.