'घरात मी कपडेच घालत नाही' म्हणतेय उर्फी, अभ्यास काय सांगतो? पाहा Naked झोपण्याचे फायदे

Uorfi Javed : चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद घरी कपड्यांशिवायच राहते. स्वतः उर्फीने केला खुलासा. अभ्यासानुसार, कपडे न घालता झोपण्याच्या आरोग्यदायी फायदे जाणून घ्या. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 5, 2023, 01:19 PM IST
'घरात मी कपडेच घालत नाही' म्हणतेय उर्फी, अभ्यास काय सांगतो? पाहा Naked झोपण्याचे फायदे title=

Naked Sleeping Benefits : उर्फी जावेद कायमच आपल्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. कधी शर्ट्सचा तर कधी चक्क कंगव्याचे कपडे तयार करून उर्फी चर्चेत असते. कधी कधी उर्फी जावेदच्या वक्तव्याची देखील खूप चर्चा होते. सध्या तिचं कपडे न घालता राहण्याच विधान चर्चेत आलं आहे. उर्फी जावेद घरात कपड्याशिवाय राहत असल्याचं सांगते. 

काय म्हणतेय उर्फी? 

एका मुलाखतीत, उर्फीला विचारण्यात आलं की, 'ती ऑफ कॅमेरा कशी असते'? तेव्हा उर्फीने सांगितलं की, 'ती नेकेड असते. मी घरी काहीच घालत नाही. मी 3 खोल्यांच घर उगाचच नाही घेते.' मी घरात कपडे घालत नसल्याचं सांगितलं. 
पण तुम्हाला माहित आहे का, अभ्यासातही Naked झोपण्याचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. अभ्यासातही याचा खुलासा झाला आहे. 

तणाव कमी होतो 

WebMD च्या रिपोर्टनुसार, कोणतेही कपडे न घालता झोपल्यावर ताण कमी होतो. यामुळे बैचेन होणं कमी होतं. नेकेड झोपल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच शरीरातील ऑक्सिटोसिनचे स्तर वाढते. तुम्ही ताण-तणावातून जात असाल तर Naked झोपण्याचे असंख्य फायदे आहेत. 

आजारांचा धोका होतो कमी 

अमेरिकेतील सीडीसीनुसार, झोपेची कमतरता असेल तर हृदयाचे आजार आणि डायबिटिसचा धोका वाढतो. जर तुम्ही कपडे काढून झोपलात तर झोप चांगल्या प्रकारे लागते. आणि या आजारांपासून धोका कमी होतो. 

वजन वाढत नाही 

Healthline च्या संशोधनात असे दिसून आले आहे की ,रात्री चांगली झोप न मिळाल्याने वजन वाढू शकते. कपड्यांशिवाय झोपल्यास चांगली झोप लागते आणि वजनही वाढत नाही. याशिवाय, कपड्यांशिवाय झोपल्याने तुमचे शरीर थंड राहते, ज्यामुळे तपकिरी चरबीचे उत्पादन वाढते आणि चयापचय सुधारते. शरीरातील ब्राऊन फॅट्सचे प्रमाण वाढल्याने लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोकाही कमी होतो.

योनीचे आरोग्य सुधारते

घट्ट अंडरवेअर परिधान करताना घाम येत असल्यास, योनिमार्गाच्या यीस्ट संसर्गाचा धोका वाढतो. विशेषत: रात्री अंडरवेअर बदलल्यानंतर झोप येत नसेल तर. कपडे न घालता झोपल्याने यीस्टच्या संसर्गापासून बचाव होतो आणि योनीमार्गही निरोगी राहतो.

पुरुषांची प्रजनन क्षमता वाढते

पुरुषांनाही कपडे न घालता झोपल्याने फायदा होऊ शकतो. घट्ट अंडरवेअर आणि कमी शुक्राणूंची संख्या यांच्यात खोल संबंध असल्याचे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. संशोधनात सहभागी असलेल्या 656 पुरुषांपैकी, ज्यांनी बॉक्सर परिधान केले होते त्यांच्या शुक्राणूंची संख्या घट्ट अंडरवेअर घालणाऱ्यांपेक्षा जास्त होती.