Cavity वर रामबाण उपाय 'या' घरगुती गोष्टींमुळे दात होतील चकाचक

Tooth Cavity पासून सुटका हवी असेल तर करा या घरगुती वस्तुंचा उपयोग

Updated: Nov 3, 2022, 04:21 PM IST
Cavity वर रामबाण उपाय 'या' घरगुती गोष्टींमुळे दात होतील चकाचक title=

मुंबई : आजकाल लोकांना वाईट खाण्याच्या सवयी लागल्या आहेत. लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती Junk Food खातांना दिसतो. या सवयींमुळे दात किडणे आणि दुखणे अशा अनेक समस्या होतात. बऱ्याचवेळा अनेकांना कॅव्हिटीची (Tooth Cavity) समस्या होते. एकदा कॅव्हिटी झाली की त्यापासून सुटका मिळणं कठीण होतं. बऱ्याचवेळा तर काही लोकांना दात काढावे लागतात. यावर काही हेल्थ एक्सपर्ट्सनं यावर काही घरगुती उपाय सांगितले आहेत. या उपायांमुळे कॅव्हिटी दुर होण्यास मदत होते. 

कॅव्हिटीपासून स्वत: ला असं वाचवा

1. जेव्हा जेव्हा दातात वेदना सुरू होतात, तेव्हा वेदना सहन करणं खूप कठीण होतं. दात किडण्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर तो संपूर्ण दाताला कॅव्हिटी होते. या समस्येत सामान्य टूथपेस्टऐवजी लवंग तेलाचा वापर केल्यास दात किडण्याची समस्या दूर होईल, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी कापसूनं लवंगचं तेल घ्या आणि तो कापूस दातावर ठेवा. यात एन्टीइन्फ्लेमेटरी आणि एन्टीबॅक्टिरीयल गुणधर्म असतात, ज्यामुळे दात किडत नाही. 

2. भारतातील सगळ्या घरांमध्ये लसूण जास्त वापरला जातो. प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच लसणाचे छोटे तुकडे कॅव्हिटी झालेल्या दातावर ठेवल्याने आराम मिळतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा : 'पतीच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं नाही अन् तू...', म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर म्हणाली...

3. दातांना झालेली कॅव्हिटी दूर करण्यासाठी पेरूची पानेही खूप प्रभावी ठरतात. ते माउथवॉश म्हणून वापरले जाऊ शकते. पेरूच्या पानांपासून माऊथवॉश बनवण्यासाठी तुम्हाला फक्त त्याची पानं धुवून त्यांचे छोटे तुकडे करावे लागतील, त्यानंतर ते पाण्यात उकळून घ्या आणि या पाण्याने तुम्हाला रोज माउथवॉश करावे लागेल. असे केल्याने तुम्हाला दातदुखीमध्ये आराम मिळेल आणि कॅव्हिटी बरी होण्यास सुरुवात होईल. (tooth cavity and mouth smell home remedies clove oil guava leaves garlic will cure decay at home) 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)