मेंदूला दुखापत (ट्रॉमेटीक ब्रेन इंज्युरी) या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

डोके म्हणजेच मेंदू आपल्या शरीरातील नाजूक भागांपैकी एक आहे. मेंदूला थोडीही दूखापत झाली

Updated: Dec 24, 2019, 11:44 AM IST
मेंदूला दुखापत (ट्रॉमेटीक ब्रेन इंज्युरी) या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

मुंबई : डोके म्हणजेच मेंदू आपल्या शरीरातील नाजूक भागांपैकी एक आहे. मेंदूला थोडीही दूखापत झाली तरी, त्याचा परिणाम आपल्या पुर्ण शरीरावर होतो, त्याचबरोबर जीवाला देखील धोका असतो. दरवर्षी भारतात लाखो लोक डोक्याची दुखापत म्हणजेच (ट्रॉमेटीक ब्रेन इंज्युरी)चे शिकार होतात आणि त्यामुळे खूप लोक त्यांचा जीव गमावून बसतात. त्यामुळे डोक्याला झालेल्या दुखापतीकडे दुर्लक्ष नका करू.

ट्रॉमेटीक ब्रेन इंज्युरी वाहन चालवतांना दुर्घटनेत किंवा हिंसक घटनेमुळे होऊ शकते. त्याचबरोबर डोक्यावर झालेल्या आघातामुळे ही होऊ शकतो. त्यामुळे डोक्यात असलेल्या रक्तवाहिन्या फाटतात आणि रक्तस्त्राव होतो. खूप वेळा स्कल फ्रॅक्चर होतो आणि रक्तवाहिन्यांना दुखापत होते, अशा स्थितीला ट्रॉमेटीक ब्रेन इंज्युरी असे म्हणतात.

ट्रॉमेटीक ब्रेन इंज्युरीची लक्षणे

काही सेकंदासाठी किंवा मिनिटांसाठी अस्वस्थ वाटतं
डोके दुखी आणि उल्टी होते.
बोलण्यात त्रास होतो आणि चक्कर येतात. शरिरावरील कंट्रोल जातो आणि स्वत: ला सांभाळणे कठीण होते.
डोळ्यांसमोर अंधार येतो आणि कानात नेहमी काही तरी वाजतंय असं वाटतं.
जीभेची चव जाते आणि प्रखर, लाइट किंवा आवाजाने देखील त्रास होतो.
डोक्याला जोरात झटका लागो किंवा छोटीशी दुखापत जरी झाली तर, त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. 
काहीवेळेस दुखापत दिसत नसेल परंतू आतमध्ये खूप मोठी असू शकते. 
दुर्लक्ष केल्यास फक्त अंधत्व नाही येणार तर, व्यक्ती कोमात जाऊ शकते.

ट्रॉमेटीक ब्रेन इंज्युरी पासून वाचण्यासाठी उपाय

गाडी चालवतांना सीट बेल्ट लावून घ्या. गाडीत एअरबॅग असणे आवश्यक आहे, म्हणजे दुर्घटना झाल्यास दुखापत न होण्यासाठी. जर सोबत लहान मूल असेल, तर नेहमी पाठीमागच्या सीटवर बसवा.

गाडी चालवतांना दारु किंवा ड्रग्सचे सेवन करू नका आणि पिल्यानंतर गाडी चालवू नका. गाडी चालवतांना आजूबाजूला लक्ष ठेवा.  

बाथरुम आणि त्याच्या आजूबाजूला मॅट ठेवा, ज्यामुळे तुम्ही घसरणार नाही. त्याच बरोबर नेहमी डोळ्यांची तपासणी करा आणि व्यायाम करा.