Sadhguru Talks About Honey: आयुर्वेदात मधाला विशेष महत्त्व आहे. नैसर्गिक मधामध्ये असलेले गुणधर्म हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. अनेक जण वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मधाचं सेवन करतात. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी, लिंबूचा रस आणि मधाचं सेवन हे आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र धार्मिक गुरु सद्गुरु म्हणतात की मधाचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास तो तुमच्यासाठी विषारी असू शकतो. जर तुम्ही अशाप्रकारे मधाचं सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा. (treading news sadhguru explains honey will turn poisonous viral video )
बरेच लोक गरम पाण्यात मध घालून पितात, परंतु असे करणे योग्य नाही. उकळत्या पाण्यात मध मिसळल्यास ते विषासारखे होते. अशा प्रकारे कधीही मध शिजवू नये. सद्गुरू सांगतात की, मध ठराविक तापमानावर शिजवल्यास ते विष बनू शकते. मध शिजवून खाल्ल्यास स्लो पॉयझनचे काम करतं असा उल्लेख आयुर्वेदात करण्यात आला आहे. त्यामुळे मध कधीही शिजवून खाऊ नये.
सद्गुरु स्पष्ट सांगतात की, मध खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे ते नेहमी कोमट पाण्यासोबत घेणे. कोमट पाण्यात मध मिसळल्यास ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जर तुम्ही लिंबू किंवा दूधासोबत मध मिसळून पिणार असाल तर पहिले तुम्ही दूध थंड करु घ्या आणि त्यानंतर त्यात मध घाला.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)